शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीतील उमेदवारांकडून खंडणी, जिल्हा रुग्णालयातील लिपिकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 14:22 IST

अपात्र ठरविण्याची धमकी देऊन १४ उमेदवारांकडून त्याने प्रत्येकी दीड हजार व एकीकडून ५००  वसूल केले आहेत. अलिबाग पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

अलिबाग : रायगड पोलिस दलात भरती पात्र झालेल्या महिला उमेदवारांना फिटनेसचे  वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी  जिल्हा सरकारी रुग्णालयातील एका लिपिकाने धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. प्रदीप ढोबळ असे या लिपीकाचे नाव असून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात तो कार्यरत आहे. अपात्र ठरविण्याची धमकी देऊन १४ उमेदवारांकडून त्याने प्रत्येकी दीड हजार व एकीकडून ५००  वसूल केले आहेत. अलिबाग पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.याप्रकरणी शल्यचिकित्सक डॉ. सुहास मानेही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रायगड जिल्हा पोलिस दलातील भरती प्रक्रिया पूर्ण होऊन  २७२ पोलिस शिपाई आणि सहा चालक अशी एकूण २७८ उमेदवारांची पात्र यादी जाहीर झाली. यामध्ये ८१ महिला उमेदवार पात्र झाले आहेत. पात्र उमेदवारांची १० मेपासून जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी प्रक्रिया सुरू झाली आहे.  खंडणीप्रकरणी पोलिस रुग्णालयातील वाॅर्डबॉयकडे विचारणा केली असता, त्याने लिपीक ढोबळ याने कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा तिसरा डोस न घेणाऱ्या उमेदवारांना प्रत्येकी १५०० रुपये द्यावे लागतील,  अन्यथा अपात्र ठरवू, असे धमकावले असल्याचे सांगितले.  एका तरुणीने  तिसरी लस घेतली होती. तिला ५०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. अशाप्रकारे ढोबळ याला २१ हजार ५०० रुपये  देण्यात आले होते. कारवाईप्रसंगी अप्पर अधीक्षक अतुल झेंडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक दत्तात्रय जाधव करीत  आहेत. 

कागदपत्रांची तपासणीगडचिरोली येथे पोलिस भरतीत बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात रायगड पोलिस दलातील एकाला अटकही झाली. पात्र उमेदवारांपैकी ३५ उमेदवार  प्रकल्पग्रस्त आहेत.  या उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल तपासणी  केली जात असून, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांची  छाननी  केली जात असल्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले.

ढोबळ याला  बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून,   कोणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले, यामागील मुख्य सूत्रधार कोण, याची सविस्तर चौकशी केली जाईल. आवश्यकतेनुसार संबंधित वरिष्ठांकडेही चौकशी केली जाईल.     - सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक 

टॅग्स :Policeपोलिसhospitalहॉस्पिटलExtortionखंडणी