शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ई-नगेट गेमिंग ॲप घोटाळ्याची व्याप्ती 1000 कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 12:25 IST

मुख्य आरोपी आमिर खानला ईडीची कोठडी; ७० कोटींची मालमत्ता जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ई-नगेट या मोबाइल गेमिंग ॲपने केलेल्या देशव्यापी आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती आता १ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याची माहिती ईडीच्या तपासातून पुढे आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी आमिर खान याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी कोलकाता येथील विशेष न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

गेल्या सप्टेंबरपासून ईडीने आतापर्यंत मुख्य आरोपी आमिर खान आणि त्याच्या साथीदारांवर चार वेळा छापेमारी करत ७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र, आमिर खान याने याव्यतिरिक्त देशभरात विविध ठिकाणच्या बँकात २०० खाती उघडली होती आणि त्याद्वारे एक हजार कोटी रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती ईडीच्या नुकत्याच झालेल्या तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे या अनुषंगाने आता पुढील तपास सुरू आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये आमिर खान या कोलकाताचा निवासी असलेल्या व्यक्तीने ई-नगेट नावाची मोबाइल गेमिंग कंपनी स्थापन करत त्याद्वारे अनेक मोबाइल गेम्स ॲपच्या माध्यमातून सादर केले होते. या गेम्समध्ये लोकांना काही पैसे डिपॉझिट म्हणून ठेवण्यास सांगितले होते, तर त्यातील गेम्स खेळण्यासाठी अतिरिक्त पैशांची आकारणी करण्यात येत होती. जे लोक गेम जिंकतील, अशा लोकांना घसघशीत बक्षिसे देण्यात येत होती. तसेच, ज्यांना खेळायचे नसेल अशा लोकांना त्यांचे उर्वरित पैसे डिपॉझिटसह परत देण्यात येत होते. मात्र, सहा महिन्यांनंतर लोकांना त्यांचे पैसे परत मिळणे बंद झाले होते. तसेच हे ॲप देखील वर्षभराने लोकांचे पैसे घेऊन इंटरनेटवरून गायब झाले होते. यानंतर देशभरामध्ये कंपनीच्या विरोधात लोकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. सप्टेंबरमध्ये या प्रकरणाचा तपास ईडीने सुरू केला आणि यातील मुख्य आरोपी आमिर खान याला अटक केली.

क्रिप्टो करन्सीमध्ये १० कोटी ईडीने आमिर खान याच्या घरावर सप्टेंबरमध्ये केलेल्या पहिल्याच छापेमारीदरम्यान त्याच्या घरातील पलंगातून ७ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. ईडीने या प्रकरणी जप्त केलेल्या एकूण ७० कोटी रुपयांपैकी सुमारे १० कोटी रुपयांची गुंतवणूक आमिर खान याने क्रिप्टो करन्सीमध्ये केल्याचे दिसून आले. ती करन्सीदेखील जप्त करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी