शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सुजित पाटकरच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; किशोर बिसुरे याचा जामिनासाठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 08:17 IST

जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकरवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या सुजित पाटकर व डॉ. किशोर बिसुरे यांच्या न्यायालयीन कोठडीत मुंबई सत्र न्यायालयाने १० नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. डॉ. किशोर बिसुरे यांनी जामिनासाठी अर्ज केला असून, न्यायालयाने त्यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

वरळी येथील एनएससीआय आणि दहिसर येथे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट सर्व्हिस कंपनीला मिळाले होते.

उत्तर देण्याचे ईडीला आदेश

 कोविड सेंटरवर कार्यरत वैद्यकीय कर्मचारी ५० ते ६० टक्के असतानाही बनावट कागदपत्रे तयार करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा आकडा वाढवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले.  लाइफलाइन कंपनीला कंत्राट मिळवून देण्यातही पाटकर यांची महत्त्वाची भूमिका होती. तसेच डॉ. बिसुरे या कोरोना केंद्रात प्रभारी म्हणून काम करत असे.  या दोघांना अटक करण्यात आली असून, ईडीने सुजित पाटकरविरोधात आरोपपत्र यापूर्वीच दाखल केले आहे.  न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या समोर बुधवारी किशोर बिसुरे याने जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने ईडीला उत्तर देण्याचे आदेश दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSanjay Rautसंजय राऊत