शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, स्वतःच्या मुलांना विकणाऱ्या दाेघींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 07:01 IST

गुन्हे शाखेच्या कक्ष १ चे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी ही कारवाई केली. वांद्रे परिसरात ज्ञानेश्वरनगर येथील लहान बालकांच्या विक्रीबाबत माहिती मिळताच तपासाअंती पथकाने स्वतःच्याच मुलांची विक्री करणाऱ्या दाेन महिलांना ताब्यात घेतले.

मुंबई : मूल न होणाऱ्या दाम्पत्याला नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश करून ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यात, स्वतःच्या मुलांना विकणाऱ्या दाेन महिलांचाही समावेश आहे. यात आतापर्यंत विकलेल्या सात बालकांची आणि त्यांच्या पालकांची माहिती मिळविण्यास पोलिसांना यश आले.गुन्हे शाखेच्या कक्ष १ चे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी ही कारवाई केली. वांद्रे परिसरात ज्ञानेश्वरनगर येथील लहान बालकांच्या विक्रीबाबत माहिती मिळताच तपासाअंती पथकाने स्वतःच्याच मुलांची विक्री करणाऱ्या दाेन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून रूपाली वर्मा, गुलशन खान, आरती सिंह, गीतांजली गायकवाड, निशा अहिरे, डॉ. धनंजय गोगा या आरोपींना अटक केली.याच आरोपींच्या चौकशीतून मुंबईसह पुणे तसेच अन्य ठिकाणी विक्री झालेल्या ७ बालकांची माहिती समोर आली. गेल्या ७ वर्षांत अनेक बालकांची विक्री केल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवजात बालकांची विक्री करणाऱ्या या टोळीमध्ये डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन यांचाही समावेश आहे. या प्रकरणी आणखी किती जणांचा समावेश आहे, हे जाळे मुंबई, पुण्यासह आणखी कुठपर्यंत विस्तारलेले आहे, अन्य काेणी म्हाेरक्या आहे का?, या अन्य बाबींचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.  

अडीच ते साडेतीन लाखांना विक्री -अडीच ते साडेतीन लाख रुपयांना बालकांची विक्री केल्याचे चौकशीत समोर आले आहे. यात बालकांच्या पालकांना ७० हजार ते दीड लाख रुपये मिळाले. उर्वरित रक्कम सहा आरोपींना दलाली म्हणून मिळाल्याची माहिती समोर आली आहेे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेMumbaiमुंबई