घातपातासाठी पेरून ठेवलेले स्फोटके जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 09:09 PM2020-12-26T21:09:39+5:302020-12-26T21:10:06+5:30

Crime News: जिल्हा पोलिसांची कारवाई : गेंडुरझरीया जंगलात पेरुन ठेवलेले होते स्फोटके

Explosives seized for criminal activity | घातपातासाठी पेरून ठेवलेले स्फोटके जप्त

घातपातासाठी पेरून ठेवलेले स्फोटके जप्त

googlenewsNext

गोंदिया : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गेंडुरझरीया जंगल परिसरात घातपात करण्यासाठी नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेले स्फोटके सालेकसा पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई २६ डिसेंबर रोजी करण्यात आली.


सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दरेकसा घाटाजवळील गेंडुरझरीया पहाडी जंगल परिसरात घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरून ठेवले असल्याची गुप्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या नेतृत्वात सी-६० सालेकसा येथीले कमांडो पथक, बी.डी.डी.एस. पथक, सालेकसा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी गेंडुरझरीया पहाडी जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबवून पहाडी उतार भागात दगडाच्या कोपऱ्यामध्ये बी.डी.डी.एस पथकाने श्वान पथकाच्या सहाय्याने ते स्फोटके जप्त केले.

एका स्टील डब्बा २० कि.ग्रॅम वजनाचा त्यात स्फोटक कांड्या सिल्वर व नारंगी रंगाचे १५० नग, ईलेक्ट्रीक डेटोनेटर २७ नग असे स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. यासंदर्भात सालेकसा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०७, १२०(ब) भादवी सहकलम १६,२०,२३ यु.ए.पी.ए. सहकलम ४, ५ भारतीय स्फोटक पदार्थ कायदा अन्वये नक्षलवाद्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास आमगावचे उपविभागीय पोलीस अधीकारी, जालींदर नालकुल करीत आहेत.

Web Title: Explosives seized for criminal activity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.