शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एकदा माफ करा! पुढचे सहा महीने मोबाइलला हात लावणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 20:48 IST

कोर्टाने त्याला माफ केले. परंतु 20 हजार रुपये दंड ठोठावला.

ठळक मुद्देएका युवकालाही ट्विटरवर एका महिलेविरूद्ध अशोभनीय पोस्ट करणं अंगलट आलं आहे. हे प्रकरण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पोहोचले. या युवकाला हायकोर्टात माफी मागत हमीपत्र दाखल करावे लागले.

चंदीगड - तरुणांना स्मार्ट फोन वापरण्याचा आणि सोशल मीडियावर सक्रिय राहण्याची आजकाल खूप आवड आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्याची चढाओढ लागलेली असते. मात्र, काहीवेळा चुकीच्या पोस्ट काही लोकांच्या महागात पडतात. एका युवकालाही ट्विटरवर एका महिलेविरूद्ध अशोभनीय पोस्ट करणं अंगलट आलं आहे. हे प्रकरण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पोहोचले. स्वतः ला वाईट प्रकारे या प्रकरणात अडकलेले पाहून नंतर तरुण कोर्टात म्हणाला की, मला माफ करा, मी सहा महिने स्मार्टफोनला स्पर्श करणार नाही. यानंतर कोर्टाने त्याला माफ केले. परंतु 20 हजार रुपये दंड ठोठावला.ट्विटरवर या महिलेविरूद्ध चुकीची टिप्पणी पोस्ट करण्यासंदर्भात होते प्रकरणया युवकाला हायकोर्टात माफी मागत हमीपत्र दाखल करावे लागले. पुढचे सहा महिने तो स्मार्टफोनचा वापरही करणार नाही अशी हमी त्या युवकाला द्यावी लागली.  या कारवाईनंतर कोर्टाने 20 हजार रुपये दंड ठोठावून सशर्त माफी मागितली. हे प्रकरण करनाल येथील एका युवकाच्याबाबतीत घडले आहे. महिलेचा पाठलाग करून धमकी दिल्याप्रकरणी १९ ऑक्टोबर २०१८ साली एका महिलेने करनाल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अटक टाळण्यासाठी या तरूणाने हायकोर्टात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. २१ फेब्रुवारी २०१९ रोजी आरोपीला हायकोर्टाने या प्रकरणात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. हायकोर्टाने याचिकाकर्त्यास सांगितले होते की, तो या चौकशीत पोलिसांना सहकार्य करेल आणि कोणतेही असे कृत्य करणार नाही ज्यामुळे फिर्यादी पक्षास अपाय होईल. 

हायकोर्टाच्या आदेशानुसार, आरोपी युवक पोलीस तपासात सहकार्य करत होता. परंतु, त्याने सोशल मीडियावर फिर्यादी महिलेविरूद्ध आक्षेपार्ह अशोभनीय पोस्ट केली. त्यानंतर महिलेने याबाबत हायकोर्टात तक्रार केली आणि आरोपी तरुणाचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी केली.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयTwitterट्विटरMobileमोबाइल