शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! शिवाजीनगर न्यायालयातील 'त्या' बेपत्ता वकिलाचा खून; तीन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 16:37 IST

'दृश्यम' फेम पोलिसांना 'मिसगाईड' करण्याचा आरोपींचा प्रयत्न...  

पुणे : शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करणारे अ‍ॅड. उमेश मोरे १ ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले होते. बरेच दिवस उलटून गेल्यावर देखील त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण मोरे यांचा जमिनीच्या वादातून खून झाला असल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासातुन समोर येत आहे. 

या खूनप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडेकर व रोहित दत्तात्रय शेंडे अशी अटक  करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 1 कोटी 70 लाख लाचप्रकरणी अटक केलेल्या वकिलाचा समावेश आहे. 

अ‍ॅड. उमेश मोरे हे बऱ्याच वर्षांपासून शिवाजीनगर कोर्टात प्रॅक्टिस करत होते. १ ऑक्टोबर रोजी ते नेहमीप्रमाणे न्यायालयात कामकाजासाठी आले होते. तिथे काही मित्रांना सुद्धा भेटले. त्यानंतर पत्नीशी बोलले आणि नऊ वाजता घरी येतो असे सुद्धा सांगितले. पण रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने दुसऱ्या दिवशी त्यांच्या कुटुंबाने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

इतक्या दिवसांनंतर देखील उमेश मोरे यांचा शोध न लागल्यामुळे नेमके त्यांच्याबाबतीत काय घडले असावे असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पोलिसांनी त्यांच्या तपासादरम्यान न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले होते. त्यात 2 संशयित व्यक्ती निदर्शनास आल्या होत्या. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक देखील स्थापन केले होते. 

'दृश्यम' फेम पोलिसांना मिस गाईड करण्याचा आरोपींचा प्रयत्न...  ताम्हिणी घाटात मोरे यांचा मृतदेह जाळून केला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच दृश्यम चित्रपटाप्रमाणे आरोपींनी पोलिसांना मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला. वकील मोरे यांचा मोबाईल त्यांनी एक तरकरीच्या गाडीत टाकला. ती गाडी फिरत राहिली व मार्केटयार्डला गेली. तेथे एका व्यापाऱ्याला तो मोबाईल सापडला. आणि पोलिसांना या घटनेतील महत्वाचा धागा दोरा मिळाला. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि या अपहरण व खून प्रकरणाचा उलगडा झाला. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयMurderखूनPoliceपोलिसArrestअटकadvocateवकिल