शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! कोपरखैरणेत भरदिवसा घरात घुसून वृद्धाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 17:25 IST

विजयकुमार दाहोत्रे (वय ६२) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा निखिल जखमी झाला आहे. ते कोपर खैरणे सेक्टर १४ येथील कृष्णा टॉवर मध्ये राहत होते. आज दुपारी इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील घरात दोघेच असताना हा प्रकार घडला.

सुर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - कोपर खैरणे येथे घरात घुसून वृद्धाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये इतर एकजण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 

विजयकुमार दाहोत्रे (वय ६२) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा निखिल जखमी झाला आहे. ते कोपर खैरणे सेक्टर १४ येथील कृष्णा टॉवर मध्ये राहत होते. आज दुपारी इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील घरात दोघेच असताना हा प्रकार घडला. अचानक घरामध्ये घुसलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी विजयकुमार यांना मारहाण करून घरातील लोखंडी वस्तू त्यांच्या डोक्यात मारल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मुलाला देखील मारहाण झाली असून त्यात तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त प्रदीप जाधव यांच्यासह कोपर खैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या हल्यामागचे नेमके कारण मात्र अद्याप कळू शकलेले नसल्याचे सहाय्यक आयुक्त प्रदीप जाधव यांनी सांगितले. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस परिसरातील तसेच इमारतीमधील सीसीटीव्ही तपासत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून