शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकाच्या आईची डोंबिवलीत हत्या, वृद्ध पतीने केले कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 07:00 IST

Crime News : डोंबिवली पूर्वेकडील गोळवली परिसरात एका ८४ वर्षीय वृध्द व्यक्तीने ८० वर्षीय वृध्द पत्नीची हत्या केल्याची घटना रविवारी घडली.

डोंबिवली -  येथील पूर्वेकडील गोळवली परिसरात एका ८४ वर्षीय वृध्द व्यक्तीने ८० वर्षीय वृध्द पत्नीची हत्या केल्याची घटना रविवारी घडली. पार्वती पाटील असे मृत पत्नीचे नाव असून आरोपीचे नाव बळीराम पाटील असे आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांचे ते आई-वडील आहेत. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न आरोपीकडून झाला. दरम्यान, ही हत्या घरगुती भांडणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून बळीराम यांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सकाळी आठच्या सुमारास हत्येची घटना उघडकीस आली. पार्वती या त्यांच्या रूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या अंगावरील कपडे जळालेल्या अवस्थेत होते. पती बळीराम हे मात्र त्यावेळी घरात नव्हते. बळीराम हे तापट स्वभावाचे असल्याने त्यांच्यात आणि पार्वती यांच्यात वारंवार वाद व्हायचा. शनिवारी मध्यरात्री अथवा रविवारी सकाळी काही कारणांवरून त्यांच्यात वाद झाला असावा आणि त्यांनी पार्वती यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  बळीराम यांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कल्याण परिमंडळ ३चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गावी यायला नकार दिल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी डोंबिवलीत दुसरी हत्येची घटना घडली. पती आणि पत्नीमध्ये वाद होऊन काही वेळेला हा वाद विकोपाला जाऊन अशा प्रकारच्या घटना घडताना पाहतो. परंतु वृध्द व्यक्तींकडून हे कृत्य घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

धारदार हत्याराने वारया घटनेप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत पार्वती यांच्यावर कोयत्यासारख्या धारदार हत्याराने नाकावर, डोळयावर, डोक्याच्या पाठीमागील बाजूस उजव्या कानावर वार करून त्यांना जीवे मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे शरीर व अंगावरील कपडे जाळण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले आहे. शनिवारी मध्यरात्री अडीच ते रविवारी सकाळी आठ च्या दरम्यान ही घटना घडल्याचेही नमूद केले . माजी नगरसेवक रमाकांत पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारी