शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

आर्यन खानसोबत अटक झालेले ८ लोक कोण आहेत? जाणून घ्या त्यांची A to Z माहिती....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 13:21 IST

Mumbai Rave Party : ड्रग्स प्रकरणी NCB कडून ८ लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. रविवारी सायंकाळपर्यंत या सर्वांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सर्वच आरोपींना अटक करण्यात आली.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच एनसीबीने (NCB) शनिवारी एक हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीवर (Rave Party) रेड टाकली होती. ज्यानंतर ८ लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. रविवारी सायंकाळपर्यंत या सर्वांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सर्वच आरोपींना अटक करण्यात आली. ज्यात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचाही समावेश आहे. अटक झालेले हे ८ लोक कोण आहेत? कुठले आहेत? त्यांचे कारनामे काय आहेत? ते काय करतात? हे सगळंच जाणून घेऊ....

मुनमुन धमेचा

मुनमुन धमेचा (Munmun Dhamecha)  एक मॉडल आहे. ३९ वर्षीय मुनमुनला एनसीबीने ३ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता अटक केली होती. ताज्या रिपोर्ट्सनुसार , मुनमुन ७ ऑक्टोबरपर्यंत ताब्यात राहणार आहे. मुनमुन धमेचा मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात राहणारी आहे. ती बिझनेस परिवारातील आहे. सध्या तिच्या परिवारातील कोणतेही सदस्य मध्य प्रदेशात राहत नाही. मुनमुनच्या आईचं गेल्यावर्षीच निधन झालं होतं. तिला एक भाऊ प्रिन्स धमेचा आहे. तो दिल्लीत काम करतो. मुनमुनच्या वडिलांचं काही वर्षापूर्वीच निधन झालं होतं. मुनमुन धमेचाचं शालेय शिक्षण सागरमध्येच झालं. ती सहा वर्षाआधी आपल्या भावासोबत दिल्लीला जाण्यापूर्वी काही काळ भोपाळमध्ये राहिली.

नूपुर सारिका

नुपूर सारिका (Nupur Sarika)  दिल्लीत लहान मुलांना शिकवण्याचं काम करते. तिला मोहकने ड्रग्स दिलं होत. नुपूर सारिका सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्समद्ये ड्रग्स लपवून रेव्ह पार्टीमध्ये पोहोचली होती. NCB ला तिच्याकडे ड्रग्स सापडलं होतं.

इशमित सिंह 

इशमित सिंह (Ishmeet Singh) दिल्लीचा राहणारा आहे. दिल्लीत त्याचे काही हॉटेल्स आहेत. त्याला पार्ट्यांची आवड आहे. त्याच्याकडे रेव्ह पार्टीमध्ये NCB ला 14 MDMA Ecstasy Pills सापडल्या होत्या.

मोहक जसवाल

मोहक जसवाल (Mohak Jaswal)  हा सुद्धा दिल्लीचा राहणारा आहे. तो एक आयटी प्रोफेशनल आहे. तो परदेशातही काम करून आला आहे. मोहकने मुंबईतूनच एका लोकल व्यक्तीकडून ड्रग्स घेतलं होतं. मग  त्यानेच ड्रग्स नुपूरकडे दिलं आणि सांगितलं की, हे सॅनिटरी पॅडमध्ये लपवून रेव्ह पार्टीमध्ये पोहोच. तिथे गेल्यावर ड्रग्स दे.

विक्रांत छोकर

विक्रांत छोकर (Vikrant Chhoker) हा सुद्धा दिल्लीचा राहणारा आहे. हा एक ड्रग्स अॅडिक्ट आहे. तो नेहमीच मनाला क्रीम आणि गोव्याला जाऊन ड्रग्स  घेतो. तो नेहमीच कुठेही फिरायला जातो. NCB ला त्याच्याकडे ५ ग्रॅम Mephedrone (Intermediate Quantity), १० ग्रॅम cocaine (intermediate) आढळून आलं.

गोमित चोप्रा

गोमित चोप्रा (Gomit Chopra) दिल्लीमध्ये एक मोठा फॅशन मेकअप आर्टिस्ट आहे. दिल्लीतील मोठमोठे सेलिब्रिटी त्याच्याकडूनच मेकअप करून घेतात. कोणत्याही ब्रायडल फॅशन शोमद्ये गोमित मॉडल्सचं मेकअप करतो. गोमित या पार्टीत आय लेन्सेसच्या बॉक्समध्ये ड्रग्स लपवून घेऊन आला होता. NCB ला त्याच्याकडे 4 MDMA Pills आणि काही प्रमाणात कोकेन सापडलं.

अरबाज मर्चेंट

अरबाज मर्चेंट (Arbaaz Merchantt), शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा शाळेतील मित्र आहे. दोघांना याआधीही एकत्र अनेक पार्टीमध्ये पाहिलं गेलंय. अरबाज मर्चेंटची इमेज वुमनायजरची आहे. म्हणजे तो एक स्त्री लंपट आहे. त्याचं एका मोठ्या सेलिब्रिटीच्या मुलीसोबतचं चॅटींग सापडलं आहे. NCB ला त्याच्याकडे ६ ग्रॅम चरस सापडलं आहे. 

श्रेयस नायर 

श्रेयस नायर (Shreyas Nayar) मुंबईतील गोरेगावमध्ये राहणारा आहे. रेव्ह पार्टीमध्ये वेगवेगळे ग्रुप पार्टी करत होते. त्यापैकी एका ग्रुपच्या लोकांना श्रेयस यानेच ड्रग्स सप्लाय केली होती. श्रेयसलाही त्या पार्टीमध्ये जायचं होतं. पण काही कारणाने तो पार्टीत जाऊ शकला नाही. श्रेयस या रेव्ह पार्टीच्या इव्हेंट मॅनेजर्सपैकी एक आहे. श्रेयस नायर, आर्यन खान आणि अरबाज मर्चेंट हे मित्रही आहेत.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थAryan Khanआर्यन खानdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी