शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दररोज एका नागरिकांची होतेय पेटीएम अपडेटच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 20:50 IST

गेल्या तीन दिवसात शहरातील पोलीस ठाण्यात किमान ३ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

पुणे : ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करुन त्यांना पेटीएमचे केवायसीची सस्पेंड झाल्याचे सांगून ते अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक करण्याचे गुन्हे दररोज समोर येऊ लागले आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी येथील ५५ वर्षांच्या गृहस्थाने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हे गृहस्थ १८ फेबुवारी रोजी घरात असताना त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तुमची पेटीएमची केवायसी सस्पेंड झाली असून मोबाईलवर संपर्क साधा, असे मेसेजमध्ये म्हटले होते. त्यानुसार त्यांनी संबंधित मोबाईलवर फोन केला. तेव्हा सायबर चोरट्याने त्यांच्या विश्वास संपादन करुन त्यांना क्विक सपोर्ट अ‍ॅप डाऊन लोड करायला सांगितले. त्यानुसार फिर्यादीने डाऊन लोड केल्यानंतर पेटीएमची लिंक असलेल्या फिर्यादीच्या बँक खात्यावरुन २५ हजार, ९ हजार ९९९ रुपये व ८ हजार ९९९ रुपये असे एकूण ४३ हजार ९९८ रुपये ऑनलाईन ट्रान्झेक्शन करुन फसवणुक करण्यात आली. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता़. त्यावरुन तपास केल्यानंतर आता बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गेल्या तीन दिवसात किमान ३ तक्रारी शहरातील पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसPaytmपे-टीएम