शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रज्ञ निघाला कुबेर! घरात सापडले मोठे घबाड, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:20 IST

EOW Raid On Scientist's House: सुशील कुमार मिश्रा असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सुशील कुमार मिश्रा याच्या सतना येथील मारुती नगर येथील घरावर छापेमारी केली. या

आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing) मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका कनिष्ठ शास्त्रज्ञाच्या (Junior Scientist) घरावर छापा (Raid) टाकला. यावेळी कथितरित्या 30 लाख रुपयांच्या रोख रकमेसह जवळपास 7 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सुशील कुमार मिश्रा असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. आर्थिक गुन्हे शाखेने सुशील कुमार मिश्रा याच्या सतना येथील मारुती नगर येथील घरावर छापेमारी केली. याबाबत रीवा लोकायुक्त एसपी वीरेंद्र जैन यांनी सांगितले की, "सर्च वॉरंट मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सतना जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कनिष्ठ शास्त्रज्ञ सुशील कुमार मिश्रा याच्या सतना येथील मारुती नगरमधील घराची झडती घेतली."

या छापेमारी दरम्यान 30,30,880 रुपये रोख रक्कम, 10 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, 21 बँक खाती, 4 विमा पॉलिसी आणि जवळपास 1.76 कोटी रुपये किमतीचे 29 भू-रजिस्ट्री कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे विरेंद्र जैन यांनी सांगितले. ही जमीन मिश्रा यांनी स्वत: पत्नी सुमन मिश्रा आणि मुलगा ज्ञानेंद्र मिश्रा यांच्या नावावर सतना शहर आणि शहरालगतच्या परिसरात घेतली होती. भोपाळच्या जमिनींची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

चौकशीत शास्त्रज्ञ निघाला करोडपती आरोपी सुशील कुमार मिश्रा याचे मारुती नगरमध्ये दुमजली घर आहे, ज्याची किंमत अंदाजे 37.50 लाख रुपये आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, आरोपीचे सतना शहराजवळ सात एकरांचे फार्महाऊस असून त्यात १५०० स्क्वेअर फूटमध्ये घर बांधले आहे. आरोपींकडून एक ट्रॅक्टर, एक महिंद्रा एसयूव्ही, एक स्कॉर्पिओ, एक इंडिका कार, 3 मोटारसायकल आणि इतर कागदपत्रे सापडली आहेत. या वाहनांची किंमत 50 लाखांहून अधिक आहे, असेही विरेंद्र जैन यांनी सांगितले.  मिळालेल्या माहितीनुसार, टीआय मोहित सक्सेना आणि प्रवीण चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखालील 25 सदस्यीय ईओडब्ल्यू टीमने या शास्त्रज्ञाच्या घरावर छापा टाकला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश