शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनीअर ‘क्रिप्टो’ आमिषाला भुलला; २५ लाख गमावून बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 07:51 IST

मोबाइल क्रमांक, बँकेचे खाते, टेलिग्राम आयडीद्वारे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून दामदुप्पट नफा मिळविण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने एका इंजिनीअर युवकाला सुमारे २५ लाखांना गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित युजर आयडी, मोबाइल क्रमांक, बँकेचे खाते, टेलिग्राम आयडीद्वारे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

संशयित सायबर गुन्हेगाराने या युवकासोबत इंटरनेट, फोनद्वारे संपर्क साधला २६ ते ३१ ऑगस्टदरम्यान त्याला दामदुप्पट नफ्याचे आमिष दाखविले. युपीआय आयडीवरून बँक खात्यांमध्ये ऑनलाइन वेगवेगळ्या वेळी विविध कारणे सांगून रकमेचा भरणा करावयास भाग पाडले. फिर्यादी युवकाने २४ लाख ५५ हजार ५०५ रुपयांचा भरणा केला. यानंतर कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद भामट्याने दिला नाही. युवकाने त्याच्याशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. व्हॉट्सॲप, टेलिग्रामसारख्या सोशल साइट्सद्वारेही संपर्क साधला असता कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळू शकला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री पटताच युवकाने सायबर पोलिस ठाणे गाठले. 

माजी सैनिकाला १७ लाखांचा चुना ओझर गावात राहणारे माजी सैनिक फिर्यादी मंगेश रहाणे यांना ऑनलाइन पद्धतीने सायबर गुन्हेगाराने ‘फॉरेक्स मार्केट’मध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडत १६ लाख ८२ हजार ७९८ रुपयांची फसवणूक केली.

युवक पुण्यात नोकरीलाउच्चशिक्षित २६ वर्षीय फिर्यादी युवक हा पुण्यात नोकरीला होता. तो इंजिनीअर आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच पुण्यातील नोकरी सोडल्याचे पोलिसांनी सांगितले. तो पंचवटीत राहत्या घरी आलेला असताना संशयित सायबर चोराने त्याच्याशी व्हॉट्सॲप, टेलिग्रामद्वारे संपर्क साधून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक केली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारी