शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ईडीने हिजबुलच्या काश्मीरमधील संपत्तीवर आणली टाच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 18:25 IST

तीन जिल्ह्यातील संपत्ती ७ वेगवेगळ्या दहशतवाद्यांच्या नावे असल्याचे उघडकीस आले आहे.   

ठळक मुद्दे. ईडीने हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एकूण १.२२ कोटींची संपत्ती जप्त केली ही तीन जिल्ह्यातील संपत्ती ७ वेगवेगळ्या दहशतवाद्यांच्या नावे असल्याचे उघडकीस आले आहे.  

नवी दिल्ली - अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) टेरर फंडिंग केसप्रकरणी दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनच्या काश्मीरमधील संपत्तीवर टाच आणली आहे. ही संपत्ती जम्मू - काश्मीरमधील अनंतनाग, बारामुल्ला आणि बांदीपुरा जिल्ह्यातील आहे. ईडीने हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा एकूण १.२२ कोटींची संपत्ती जप्त केली असून ही तीन जिल्ह्यातील संपत्ती ७ वेगवेगळ्या दहशतवाद्यांच्या नावे असल्याचे उघडकीस आले आहे.    हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सईद सलाउद्दीनच्या मालकीच्या १३ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मार्च महिन्यात ईडीने दिले होते. या सर्व मालमत्ता जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. सलाउद्दीन पाकिस्तानात वास्तव्याला असून भारतातील दहशतवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा केल्याने त्याच्या सर्व मालमत्तांवर टाच आणण्यात आल्याचे सांगण्यात आले. सलाउद्दीन याच्यासह बांदीपुरातील मोहम्मद शफी शहा तसेच अन्य सहा जणांच्या मालकीची १.२२ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता जप्त करण्याबाबत आदेश जारी करण्यात आले होते. मोहम्मद शफीसह ज्या सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे ते सर्वजण दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याची ईडीची माहिती आहे. या सर्वांविरुद्ध आरोपपत्र दाखल असून त्याआधारेच कारवाई करण्यात आली आहे.काश्मीरमधील दहशतवादी कारवाया तसेच फुटिरतावाद्यांना आर्थिक रसद पुरवण्याचे काम हिजबुल मुजाहिदीनकडून केले जात आहे. या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सईद सलाउद्दीन पाकिस्तानातील रावळपिंडी येथे आश्रयाला असून 'जकार्त'च्या (जम्मू अँड काश्मीर अफेक्टीज रीलिफ ट्रस्ट) आडून तो भारतात दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत असल्याचे ईडीने जारी केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले होते. सलाउद्दीनला पाकमधील अन्य दहशतवादी संघटनांसह आयएसआयचेही पाठबळ असून हवाला तसेच अन्य माध्यमातून तो भारतात पैसे पाठवत असल्याचे उघडकीस आले आहे.

टॅग्स :Hizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीनterroristदहशतवादीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय