शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक; कारमधील स्फोटके, मनसुख हिरेन हत्या प्रकरण भोवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 06:56 IST

शर्माने विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन नालासोपारातून शिवसेनेच्या तिकिटावर महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ॲण्टेलिया जवळील कारमधील स्फोटके व ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी वादग्रस्त माजी पोलीस एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक केली. लोणावळा येथील एका रिसॉर्टवरून त्याला ताब्यात घेण्यात आले तर अंधेरीतील त्याच्या फ्लॅट व फाउंंडेशनच्या कार्यालयावर छापे टाकून महत्त्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यात आले.

शर्माने विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन नालासोपारातून शिवसेनेच्या तिकिटावर महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारींमध्ये  प्रदीप शर्माचाही उल्लेख आहे.  त्यामुळे त्याच्यावरील कारवाई परमबीर सिंग यांच्यासाठीही अडचणीची ठरण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. 

एनआयएने आतापर्यंत शर्मा याच्याशिवाय  मुख्य आरोपी असलेला सचिन वाझे, रियाज काझी व सुनील माने या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना, तर लखन भय्या एन्काउंटरमध्ये बडतर्फ असलेल्या विनायक शिंदेला अटक केली आहे. आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

                         शर्मासह तिघांना अटकn एनआयएने गुरुवारी प्रदीप रामेश्वर शर्मा याच्यासह आणखी दोघांना अटक केली. n सतीश तिरूपती मोठकुरी ऊर्फ तानी भाई ऊर्फ विक्की बाबा (४०, रा. महात्मा जोतीराम फुलेनगर, मालाड, पूर्व) व मनीष वसंत सोनी (४६, रा. चिंचोली बंदर, मालाड पश्चिम) अशी त्यांची नावे आहेत.  n मनसुखच्या हत्येसाठी या दोघांना प्रदीप शर्माने पैसे दिले होते. त्याचा मृतदेह रेतीबंदर येथे नेऊन कोठे टाकायचा, हेही या दोघांसह अन्य आरोपींना त्यानेच सांगितले होते, असे सूत्रांनी सांगितले.

आजी-माजी पोलीस गजाआड n एनआयएने गेल्या रविवारी पश्चिम उपनगरातील बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना अटक केली. हे दोघेही प्रदीप शर्माच्या फाउंडेशनमध्ये पदाधिकारी होते. हिरेनच्या हत्येवेळी ते उपस्थित असल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्यांच्याकडील चौकशीतून शर्माचाही सहभाग स्पष्ट झाल्याने तपास पथक त्याच्या मागावर होते. n गुरुवारी सकाळी त्याला लोणावळ्यातील एका रिसॉर्टवरून ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी अन्य दोन पथकांनी अंधेरीतील त्याचा फ्लॅट व कार्यालयावर  छापा टाकला. जवळपास पाच तासांच्या झडतीत महत्त्वपूर्ण कागदपत्रे, रोकड, लॅपटॉप व अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आल्याचे समजते.  n शर्माकडे सुमारे ६ तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर  जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला एनआयएच्या विशेष न्यायालयाने २८ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. 

टॅग्स :Pradeep Sharmaप्रदीप शर्माNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा