बनावट कागदपत्रांंद्वारे मिळवली पालिकेत नोकरी, एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 08:19 AM2021-02-20T08:19:03+5:302021-02-20T08:19:20+5:30

Crime News : पालिकेचे सहायक मुख्य पर्यवेक्षक अतुल प्रभाकर जातेगावकर (५७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Employed in the municipality obtained through fake documents, filed a case at MRA Marg police station | बनावट कागदपत्रांंद्वारे मिळवली पालिकेत नोकरी, एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांंद्वारे मिळवली पालिकेत नोकरी, एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next

मुंबई : बनावट कागदपत्रांद्वारे एका महिलेने पालिकेत नोकरी मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिकेचे सहायक मुख्य पर्यवेक्षक अतुल प्रभाकर जातेगावकर (५७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पालिकेच्या ई-वाॅर्ड येथे घनकचरा व्यवस्थापन येथे निर्मला शामजी कातरिया या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पी.टी. कमिटीअंतर्गत केलेल्या चौकशीत हा प्रकार उघड होताच महिलेविराेधात पाेलिसांत तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार एमआरए मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Employed in the municipality obtained through fake documents, filed a case at MRA Marg police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.