बनावट कागदपत्रांंद्वारे मिळवली पालिकेत नोकरी, एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 08:19 IST2021-02-20T08:19:03+5:302021-02-20T08:19:20+5:30
Crime News : पालिकेचे सहायक मुख्य पर्यवेक्षक अतुल प्रभाकर जातेगावकर (५७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बनावट कागदपत्रांंद्वारे मिळवली पालिकेत नोकरी, एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई : बनावट कागदपत्रांद्वारे एका महिलेने पालिकेत नोकरी मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालिकेचे सहायक मुख्य पर्यवेक्षक अतुल प्रभाकर जातेगावकर (५७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पालिकेच्या ई-वाॅर्ड येथे घनकचरा व्यवस्थापन येथे निर्मला शामजी कातरिया या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पी.टी. कमिटीअंतर्गत केलेल्या चौकशीत हा प्रकार उघड होताच महिलेविराेधात पाेलिसांत तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार एमआरए मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.