मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी आरोपी असलेले सामाजिक कार्यकर्ते व प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.
एनआयए ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात अपयशी ठरल्याने आपला जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती तेलतुंबडे यांनी केली. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर आनंद तेलतुंबडे यांनी १४ एप्रिल रोजी विशेष एनआयए न्यायालयात शरणागती पत्करली. त्यानंतर एनआयएने त्यांची चौकशी केली. ९१ दिवस उलटले तरी एनआयएने आरोपपत्र दाखल न केल्याने तेलतुंबडे यांनी जामीन अर्ज केला. १९ जुलै रोजी न्यायालयाने एनआयएला आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ९० दिवसांची मुदतवाढ दिली.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाड्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत तेलतुंबडे यांनी प्रेझेंटेशन दिले व चिथावणीखोर भाषणही दिले.