शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
2
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
4
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
5
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
6
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
7
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
9
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
10
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
11
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
12
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
13
कॉलेजमधली एक भेट, फेसबुकवर मेसेज अन् मग...; संजू सॅमसनला असा मिळाला 'आयुष्याचा जोडीदार'
14
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ६०० चिनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी
15
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
16
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
17
Blood Moon: रविवारी आकाशात असेल ‘ब्लड मून’ची मेजवानी
18
पंजाबमध्ये पुरामुळे मोठं नुकसान, धावून आला अक्षय कुमार; नुकसानग्रस्तांसाठी ५ कोटींची मदत
19
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
20
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज

विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:15 IST

मनीषाने सासरच्या छळाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. मात्र, मृत्यूपूर्वी तिने बनवलेला एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्याला हादरवणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. छपरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रठौंडा गावात हुंड्यासाठी सासरच्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून मनीषा या नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. पण या घटनेनंतर जो खुलासा झाला आहे, तो ऐकून संपूर्ण समाज सुन्न झाला आहे. मनीषाने मंगळवारी रात्री विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं. मात्र, मृत्यूपूर्वी तिने बनवलेला एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यात ती रडत रडत आपल्यावर झालेल्या अत्याचाराची भयानक कहाणी कॅमेऱ्यासमोर मांडताना दिसली आहे.

थार गाडी मागितली, करंट लावून मारण्याचा प्रयत्न केला!व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मनीषा स्पष्टपणे सांगत आहे की, तिचा पती कुंदन, सासू-सासरे आणि दीर तिला सतत हुंड्यासाठी त्रास देत होते. त्यांनी फक्त मारहाणच केली नाही, तर गर्भवती असताना तिचा जबरदस्तीने गर्भपातही करवला. मनीषाने व्हिडीओमध्ये सांगितलं की, तिच्याकडून वारंवार थार गाडी आणि रोख पैशांची मागणी केली जात होती. 

"माझ्या वडिलांनी लग्नात २० लाख रुपये खर्च केले, बुलेट गाडीही दिली," असंही तिने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. जेव्हा ती या मागण्या पूर्ण करू शकली नाही, तेव्हा तिला करंट लावून मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता, असा गंभीर आरोप तिने केला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे.

शरीरावरच लिहिली होती सुसाईड नोटयाआधी बुधवारी एक आणखी धक्कादायक बातमी समोर आली होती. मनीषाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या हात, पाय आणि पोटावर मार्कर पेनने सुसाईड नोट लिहिली होती. त्यात तिने स्पष्टपणे म्हटलं होतं की, "माझ्या मृत्यूला कुंदन आणि त्याचं कुटुंब जबाबदार आहे." घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि नंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

दोषींना शिक्षा होणार?मनीषाच्या भावाने, रितिकने, तिचा पती कुंदन, सासू-सासरे आणि दोन दीर यांच्याविरोधात छपरौली पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली तक्रार दाखल केली आहे. बागपतचे पोलीस अधीक्षक सूरज कुमार राय यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितलं की, "प्राथमिक तपासात हे आत्महत्येचं प्रकरण वाटत आहे. मृतदेहावर लिहिलेली सुसाईड नोट आणि व्हिडीओचा तपास केला जात आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला जात आहे आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे."

२०२३ मध्ये झालं होतं लग्न, जुलै २०२४ पासून छळ वाढलामनीषाचं लग्न २०२३ मध्ये नोएडाच्या सिद्धिपूर गावच्या कुंदनसोबत झालं होतं. लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्या लोकांनी तिच्यावर हुंड्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली होती. जुलै २०२४ मध्ये तिच्या वडिलांनी तिला सासरहून माहेरी आणलं होतं. चार दिवसांपूर्वी दोन्ही बाजूंमध्ये संबंध तोडण्याबाबत बोलणी झाली होती. मात्र, मनीषाने स्पष्ट सांगितलं होतं की, जोपर्यंत हुंड्याचं सामान आणि लग्नाचा खर्च परत मिळत नाही, तोपर्यंत ती घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करणार नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशdowryहुंडा