शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चाकण येथे आठ महिन्यांच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडवून पित्याने केला खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 17:12 IST

पत्नीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून आपल्या आठ महिन्यांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडवून निर्घृण खून केला असल्याची घटना नाणेकरवाडी (ता.खेड ) येथील ज्योतिबानगरमध्ये घडली. 

ठळक मुद्देपित्यावर गुन्हा दाखल, बायकोसोबत झालेल्या भांडणातून केला खून 

चाकण : पत्नीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून आपल्या आठ महिन्यांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडवून निर्घृण खून केला असल्याची घटना नाणेकरवाडी (ता.खेड ) येथील ज्योतिबानगरमध्ये घडली. याप्रकरणी बाळाचा बाप चक उर्फ राजू सुरत सुनार ( वय २४, रा. ज्योतिबानगर, नाणेकरवाडी, चाकण, मूळ रा. गाबिश, जि. आछाम, नेपाळ ) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी ( दि. १९ ) सकाळी पावणे सात ते साडे सातच्या दरम्यान घडली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल चक उर्फ राजू सुनार ( वय ८ महिने ) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत प्रवीण बब्रुवान झुंजार ( वय २९, रा. ज्योतिबानगर, नाणेकरवाडी, चाकण, मूळ रा. कवठळी, जि. सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण झुंजार यांच्या मालकीच्या खोलीत आरोपी राजू व त्याची पत्नी निर्मला हे आपल्या दोन मुलांसह भाड्याने राहत होते. नवरा बायकोचे भांडण झाल्यामुळे पत्नी निर्मला शुक्रवारी पहाटे दोन्ही मुलांना पतीजवळ सोडून कोठेतरी निघून गेली. याचा राग मनात आरोपीने आठ महिन्यांचा मुलगा साहिल यांस बाथरूमजवळील पाण्याच्या टाकीत टाकून बुडवून त्याचा खून केला. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सह पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :ChakanचाकणPuneपुणेPoliceपोलिसArrestअटकMurderखून