शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वंशाच्या दिव्यासाठी न्यायाधीशाच्या मुलीचा आठ वेळा गर्भपात, पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा, उच्चभ्रू वस्तीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 08:14 IST

Crime News : भारतामध्ये बंदी असलेल्या ट्रीटमेंटसाठी संमतीशिवाय परदेशात नेऊन जवळपास ८ वेळा ही ट्रीटमेंट करून गर्भपात केला.

- मनीषा म्हात्रे

मुंबई : उच्चशिक्षित, श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंब बघून, निवृत्त न्यायाधीश असलेल्या वडिलांनी थाटामाटात मुलीचा विवाह करुन दिला. मात्र, याच प्रतिष्ठेच्या आड विकृत मानसिकता दडली होती. वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा या हव्यासापोटी पतीने या निवृत्त न्यायाधीशांच्या मुलीचा परदेशात नेऊन तब्बल आठ वेळा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये समोर आली आहे.सासरच्यांनी घराबाहेर काढल्यानंतर, मुलीने दादर पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी या प्रकरणी वकील कुटुंबाविरुद्ध गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्यासह हुंड्यासाठी छळ व अन्य कलमांतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या आई-वडिलांसोबत ४० वर्षीय तक्रारदार महिला राहतात. वकिली क्षेत्रातील प्रतिष्ठित मुलासोबत २००७ मध्ये विवाह लावून दिला. सोबत ६२ तोळे सोन्याचे दागिनेही दिले. पती व सासू, सासरे वकील, तर ननंद डॉक्टर आहे. महिन्याला ७ ते ८ लाख उत्पन्न आहे.‘मला माझा वंश व मालमत्ता जपण्यासाठी मुलगा हवाय,’ म्हणत मारझोड सुरू झाली. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरांकडे मुलगा होण्यासाठी उपचार घेतले, तसेच पतीने प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस (जन्मापूर्वी लिंग तपासणीसाठी बीजाची अंमलबजावणी) या टेस्टसाठी बॅंकॉकमध्ये नेले. तेथे ८ वेळा गर्भ धारणेच्या आधी एम्ब्रियोच्या लिंगाची (बीजाची) परीक्षा करून उपचार व शस्त्रक्रिया करीत होते. यासाठी जवळपास दीड हजारांपेक्षा जास्त हार्मोनल व स्टिरॉइड इन्जेक्शन देण्यात आली होती. भारतामध्ये बंदी असलेल्या ट्रीटमेंटसाठी संमतीशिवाय परदेशात नेऊन जवळपास ८ वेळा ही ट्रीटमेंट करून गर्भपात केला.

न जन्मलेल्या मुलासाठी कोट्यवधी रुपये खर्च महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाच्या काही दिवसांतच पतीकडून छळ सुरू झाला. सासू आणि पतीने संयुक्त खाते उघडून खात्यातील ३४ लाख रुपये त्यांच्या खात्यात वळते केले. घरात मोलकरीण बनविले. २००९ मध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर अत्याचारात वाढ झाली. २०११ मध्ये पुन्हा गर्भवती राहिल्याने पतीने डॉक्टराकडे नेले आणि मूल नको असल्याचे सांगत गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. २०१५ मध्ये पुन्हा मारहाण झाली. यात ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने तिने घर सोडले. मुलीच्या वाढदिवसासाठी १० रुपयांचे चॉकलेट घेतले नाही. मात्र, न जन्मलेल्या वंशाच्या दिव्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. जवळपास ६८ तोळे सोने व रोख ७० लाख रुपये सासरच्या मंडळीकडे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

टॅग्स :Abortionगर्भपातCrime Newsगुन्हेगारी