शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंडी विक्रेता बनला चोर; गुंगीचं औषध देऊन लुटायचा प्रवाशांना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 14:16 IST

रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. जगदीश साहू असं त्याचं नाव आहे. तसेच दीपक सोनी आणि साईल खान हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देजगदीश, दीपक आणि साईल हे तिघेही भोपाळचे रहिवासी आहेत. दीपक सोनी आणि साईल खान हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.जगदीश हा अयोध्या नगर येथे अंडे विक्री करायचा. दरम्यान, जगदीशची दीपकसोबत ओळख झाली. 2014 मध्ये दीपक हा तुरुंगामधून सुटला.

मुंबई - बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमधील प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्याला रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनीअटक केली. जगदीश साहू असं त्याचं नाव आहे. तसेच दीपक सोनी आणि साईल खान हा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विनय गाडगीळ, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संतोष धनवटे, सहायक निरीक्षक किरण मतकर, पोलीस हवालदार सुनील लोणकर, बबन कदम, दिलीप खोतकर, पोलीस नाईक महेश निकम, लक्ष्मण कुटे, पृथ्वीराज मोरे, राहुल माने यांचे पथक तपास करत होते. तपासादरम्यान लोणकर आणि स्टाफ हे अंधेरी येथे आले त्यावेळी पोलिसांना पाहून जगदीश साहू पळ काढू लागला. त्याला पकडून पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान जगदीशने दीपक आणि साईलच्या मदतीने चोऱ्या केल्याचे कबुल केले. 

जगदीश, दीपक आणि साईल हे तिघेही भोपाळचे रहिवासी आहेत. जगदीश हा अयोध्या नगर येथे अंडे विक्री करायचा. दरम्यान, जगदीशची दीपकसोबत ओळख झाली. 2014 मध्ये दीपक हा तुरुंगामधून सुटला. त्यानंतर ते तिघे मिळून एक्स्प्रेसमध्ये चोऱ्या करू लागले. दीपक आणि साईल हे एकटा असलेल्या प्रवाशाला लक्ष करायचे. त्याला चहा, कॉपी, बिस्किटमधून गुंगीचे औषध द्यायचे. प्रवासी बेशुद्ध झाल्यावर दीपक आणि साईल हे प्रवाशाजवळील सामान चोरी करून नेण्याचे काम जगदीश करत नाही. दीपक हा त्याच्या सासऱ्याच्या औषधाच्या चिठ्ठीचा वापर करून मेडिकलमधून औषध खरेदी करायचा. त्या गुंगीच्या औषधाचा वापर चोरीसाठी करत असे अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Robberyदरोडाrailwayरेल्वेPoliceपोलिसArrestअटकOdishaओदिशा