शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

टॉलीवुडमध्ये खळबळ! रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रव‍ि तेजासह 12 जणांना ED ची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 06:44 IST

ED Summoned Rakul Preet Singh, Rana Daggubati: अबकारी विभागाने जुलै 2017 मध्ये एका प्रसिद्ध बारवर छापा टाकला होता. या ठिकाणी झालेल्या झाडाझडतीनंतर वेगवेगळी 12 प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणांवर 11 चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत. 

प्रवर्तन निदेशालय (ED) ने चार वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणात टॉलीवुडच्या टॉपचे अभिनेते, अभिनेत्री आणि डायरेक्टर्सना समन्स पाठविला आहे. यामध्ये रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh), राणा दग्गुबाती (Rana Daggubati), रव‍ि तेजा (Ravi Teja), पुरी जगन्नाथ यांचा समावेश आहे. (ED summons Tollywood celebrities Rakul Preet, Rana Daggubati, Ravi Teja and Puri Jagannadh in drugs case)

सर्व अ‍ॅक्टर्सना तारखेसह नोटीस पाठविण्यात आली आहे. रकुल प्रीत सिंह 6 सप्टेंबर, राणा दग्गुबाती 8 सप्टेंबर, रवी तेजा 9 सप्टेंबर आणि पुरी जगन्नाथ 31 सप्टेंबर या तारखांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय चार्मी कौर, मुमैथ आणि अन्य लोकांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात आतापर्यंत 12 लोकांना नोटीस पाठविण्यात आली आहे. 

अबकारी विभागाने जुलै 2017 मध्ये एका प्रसिद्ध बारवर छापा टाकला होता. या ठिकाणी झालेल्या झाडाझडतीनंतर वेगवेगळी 12 प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणांवर 11 चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत. रकुल प्रित सिंह दाक्षिणात्य सिनेमांसह बॉलिबुडच्या हिंदी सिनेमांतही झळकली आहे. तिने यारिया, अय्यारी, देदे प्यार दे, सरदार का ग्रँडसन या सिनेमांमध्ये काम केले आहे. तर बॉलिवुडमधील गाजलेला व्हिलन भल्लालदेवची भूमिका साकारणारा राणा दग्गुबाती देखील साऊथचा प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने गाझी अ‍ॅटॅक, बेबी, दम मारो दम, हाथी मेरे साथी या बॉलिवुड सिनेमांमध्ये काम केले आहे. 

रवी तेजा तेलगु सिनेमाचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने Nee Kosam, Itlu Sravani Subramanyam, Chiranjeevulu,  Dubai Seenu, Krishna, Baladur, Neninthe, Kick सारखे प्रसिद्ध सिनेमे दिले आहेत. तर पुरी जगन्नाथ हा दिग्दर्शक धर्मा प्रॉडक्शनसोबतच्या लायगर फिल्ममुळे चर्चेत आहे. त्याने बुढ्ढा होगा तेरा बाप या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.  

टॅग्स :rana daggubatiराणा दग्गुबतीRakul Preet Singhरकुल प्रीत सिंगEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय