शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एचपीझेड पेमेंट गेटवेवर ईडीचा छापा; कारवाईत ९१ कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 06:19 IST

कारवाईत ९१ कोटींची मालमत्ता जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पैशांच्या ऑनलाइन व्यवहारांसाठी पेमेंट गेट-वेची सुविधा पुरविणाऱ्या एचपीझेड या कंपनीच्या मुंबई, गुरुग्राम व बंगळुरू येथील कार्यालयांवर छापेमारी करत कंपनीच्या देशभरात असलेल्या विविध बँक खात्यांतील ९१ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीचे व्यवहार हाताळण्यात येत होते. सामान्य गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणुकीसाठी आकर्षित करून भरभक्कम परतावा देण्याचे आमिष कंपनीने दाखवले होते. मात्र, या प्रकरणी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली होती. विशेष म्हणजे या प्रकरणी सर्वप्रथम नागालँड राज्याची राजधानी असलेल्या कोहिमा शहरात पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. मात्र, या घोटाळ्याची व्याप्ती देशव्यापी असल्याचे आणि यात शेकडो कोटींचे व्यवहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास ईडीने सुरू केला होता. या प्रकरणाची चौकशी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू आहे. त्यावेळी, भूपेश अरोरा नावाच्या व्यक्तीची या घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे ईडीच्या तपासादरम्यान लक्षात आले. तसेच त्यावेळी कंपनीची २९ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. 

आतापर्यंत १७८ कोटीतपासादरम्यान आणखी तपशील मिळाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा छापेमारी केली आणि यावेळी कंपनीच्या देशभरातील बँक खात्यात असलेले ९१ कोटी रुपये जप्त केले आहेत. दरम्यानच्या काळात देखील कंपनीची काही मालमत्ता ईडीने जप्त केली होती. या प्रकरणी आतापर्यंत एकूण १७८ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झालेली आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग