शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली दारु घोटाळ्यात ईडीही बरबटलेली! ५ कोटींची लाच, सीबीआयने सहा. संचालकाला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 08:42 IST

दिल्ली दारु नीति घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे.

दिल्ली दारु नीति घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या एका अधिकाऱ्याला ५ कोटींची लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आले आहे. ईडीमध्ये सहाय्यक संचालक पदावर असलेल्या पवन खत्री या अधिकाऱ्याने आरोपी अमनदीप सिंह ढल्ल याच्याकडून ५ कोटींची लाच घेतली होती. सीबीआयने खत्रीसोबत दोन अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याच्या आरोपाखाली तक्रार नोंदविली होती. आता तपासानंतर खत्रीला अटक करण्यात आली आहे. 

ईडीच्या विनंतीवरून सीबीआयने दोन आरोपी अधिकारी, सहायक संचालक पवन खत्री आणि अतिरिक्त विभागीय लिपिक नितेश कोहर यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता. या प्रकरणात अन्य आरोपींमध्ये एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, व्यापारी ढल्ल, बिरेंदर पाल सिंग, चार्टर्ड अकाउंटंट प्रवीण कुमार वत्स, क्लेरिजेस हॉटेलचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर काही लोकांचा समावेश आहे. ढल्ल आणि सिंह यांनी दारु घोटाळ्याच्या चौकशीमध्ये आरोपींची मदत करण्यासाठी डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २३ या दोन महिन्यांत वत्स यांना ५ कोटी रुपये दिले होते. सांगवानने ढल्लना अटकेपासून वाचविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. याचसाठी सांगवानने वस्त याची ईडी अधिकारी खत्री यांची भेट घडवून दिली होती. यानंतर या दोन महिन्यांत वत्सने ढल्लकडून ५०-५० लाख रुपयांच्या हप्त्यांत ३ कोटी रुपये घेतले होते. यानंतर सांगवानने आणखी २ कोटी रुपये मिळाले तर ढल्लचे आरोपींमधून नाव काढून टाकले जाईल असे सांगितले होते. यानंतर पुन्हा चार हप्त्यांमध्ये २ कोटी रुपये दिले गेले. हे पैसे कॅशमध्ये दिले गेले होते. एवढे पैसे देऊनही ढल्लला १ मार्चला ईडीने अटक केली होती. यावर सांगवानने वत्सला हे आदेश वरून आलेत असे उत्तर दिले होते. यानंतर दिलेले पैसे मागे देण्यासाठी बोलणी सुरु झाली आणि सारे बिंग फुटले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचे समजले. ईडीने वत्सच्या घरी रेड टाकली आणि घरातून २.१९ कोटी रुपयांची रोकड आणि १.९४ कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने सापडले. तसेच त्यांच्या बँक खात्यात २.६२ कोटी रुपये होते. यावर वत्सला ताब्यात घेतले गेले आणि पुढे ईडीच्या अधिकाऱ्यांचे नावही समोर आले. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग