शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वेबसीरिज चित्रणकरणादरम्यान मारहाण प्रकरण; तिघांना अटक तर एक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 15:04 IST

गायमुखच्या घटनेत एक फरार : पोलिसांवर पैसे घेतल्याचा आरोप

ठळक मुद्देशूटिंगच्या व्हॅनिटी व्हॅनची काच फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून गुरुवारी दुपारी तिघांना अटक केली. एक जण फरार असून अटकेतील तिघांना २४ जूनपर्यंत कोठडी मिळाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

ठाणे - वेबसीरिजच्या चित्रणादरम्यान शूटिंगस्थळी आलेल्या चौघांनी बेकायदेशीर जमाव करून सेटवरील संतोष तुंडेल, सोहम शहा आणि उदित पेडणेकर या तिघांना बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. त्यामध्ये संतोषच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच शूटिंगच्या व्हॅनिटी व्हॅनची काच फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून गुरुवारी दुपारी तिघांना अटक केली. यातील एक जण फरार असून अटकेतील तिघांना २४ जूनपर्यंत कोठडी मिळाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.याचदरम्यान मारहाणीनंतर कलाकार मंडळीने व्हायरल केलेल्या व्हिडीओत पोलिसांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. परंतु, पोलिसांनी त्या आरोपाचे खंडण करून ज्यांनी मागणी केली, त्याच्याबाबत तक्रार करा. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सांगितले.या मारहाणीप्रकरणी केलेल्या तक्रारीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर गुरुवारी दुपारी भाईंदर पूर्व येथील कृष्णा अमरसिंग सोनार (३४), पालघरातील सोनू वीरेंद्र दास (२४) आणि भाईंदर पूर्वेकडील सुरज महेंद्रनाथ शर्मा (२९) अशा तिघांना अटक केली. त्यानंतर, ठाणे न्यायालयात हजर केल्यावर त्यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच फरार रोहित गुप्ता आणि अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. तसेच शूटिंगची कोणतीही परवानगी घेतली नव्हती आणि याबाबत संबंधितांनी पोलिसांनाही कळवले नसल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी सांगितले.गायमुख येथे गर्दी झाल्याचे समजल्यावर पोलीस तेथे गेले. त्यावेळी एक जण साहित्याची आवराआवर करत होता. तसेच शूटिंग करणारे कलाकार तेथून निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, काही कलाकारांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून पोलिसांनीच त्या आलेल्या लोकांना मारहाण करण्यास सांगितले. तसेच पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. तो चुकीचा असून ज्यांनी मागणी केली, त्याची माहिती द्यावी, यासाठी त्यांना फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीष पोटे पुढील तपास करत आहेत.

अशी घडली घटना

गोरेगाव येथे राहणारे आणि प्रॉडक्शन डायरेक्टर असलेले इम्पल आहुजा (३७) यांनी दिलेल्या तक्रारीत घोडबंदर रोडवरील गायमुख येथील एका बंद कंपनीत फिक्सर या वेबसीरिजचे शूटिंग चालू होते. त्यावेळी एकास्पॉट एजन्सीची काही मंडळी तेथे आली. त्यांनी बेकायदेशीर लोक जमवून काही कारण नसताना कलाकारांना बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच शूटिंगसाठी लावलेल्या कॅमेऱ्याला धक्का देऊन तो खाली पाडला. तसेच व्हॅनची काच फोडून तिचे नुकसान केले.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसbollywoodबॉलिवूडWebseriesवेबसीरिज