शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे, 1.21 कोटींचा दंड वसूल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 18:32 IST

लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत 1 कोटी  21 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचे नियम उल्लंघन करून राज्यभरात आतापर्यंत पोलिसांनी केलेली दंडात्मक कारवाई कोटींच्या घरात पोहोचली आहे. लॉकडाऊनचे  नियम मोडणाऱ्यांविरोधात भा. दं. सं कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाते.

मुंबई - देशात कोरोना व्हायरसने हातपाय पसरले असून याला आळा घालण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, लॉकडाऊनचे नियम उल्लंघन करून राज्यभरात आतापर्यंत पोलिसांनी केलेली दंडात्मक कारवाई कोटींच्या घरात पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत 1 कोटी  21 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.मुंबईत लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणतीही कार्यालये, दुकाने आदी चालविण्यास मनाई होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा किराणा दुकान आणि अत्यावश्यक सेवांची दुकाने उघडण्याची मुभा दिली आहे. यामुळे नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या लॉकडाऊनमध्ये समूहाने एकत्र येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. नागरिकांनी एकत्रित बाहेर पडून संसर्गाची भीती वाढू नये म्हणूनच राज्य सरकारने संचारबंदी लागू केली. पण त्यानंतरही विनाकारण गाड्या फिरवणा-यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई आता एक कोटींच्या पार पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत एक कोटी 21 लाख 99 हजार 44 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल आहे. याशिवाय 18 हजार 995 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊनचे  नियम मोडणाऱ्यांविरोधात भा. दं. सं कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाते. त्यानुसार पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवून कायदे मोडणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. राज्यभरात आतापर्यंत कलम 188 अंतर्गत 34 हजार गुन्हे दाखल करण्यात आला आहे. राज्यात आणि मुंबईत करोना हळूहळू हातपाय पसरू लागलेला असताना करोना आणि त्या संदर्भात सरकारकडून केल्या जाणाऱया उपाययोजनांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर अफवांना उधाण आले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व सायबर पोलीस सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेऊन असून राज्यातील 161गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील सायबर पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहे. याशिवाय पोलिासंवर हल्ला झाल्याप्रकरणी 69 गुन्हे राज्यभरात दाखल करण्यात आले आहेत.  

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या