शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

लॉकडाऊनदरम्यान विकले जात होते अमली पदार्थ, पोलिसांनी कारवाई करत केली एकास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 19:33 IST

तुर्भे एमआयडीसी परिसरात केली कारवाई

ठळक मुद्दे तुर्भे एमआयडीसीमधील आंबेडकर नगर परिसरात हि कारवाई करण्यात आली आहे.गांजा, चरस व विदेशी दारू असा 2 लाख 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 नवी मुंबई - लॉकडाऊनच्या कालावधीतही तुर्भे एमआयडीसी परिसरात अमली पदार्थ विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून गांजा, चरस व विदेशी दारू असा 2 लाख 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.तुर्भे एमआयडीसीमधील आंबेडकर नगर परिसरात हि कारवाई करण्यात आली आहे. त्याठिकाणी अमली पदार्थ व दारू विकली जात असल्याची माहिती विशेष पथकाचे सहायक निरीक्षक जी. डी. देवडे यांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त पंकज डहाणे व सहायक आयुक्त  भरत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली देवडे यांच्या  पथकाने सापळा रचला होता. 

यावेळी तुर्भे नका येथे दोघेजण संशयास्पद वावरताना आढळून आले. त्यांना पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता एकाने पळ काढला. दरम्यान शरीफ गाणी शेख हा पोलिसांच्या हाती लागला असता पळालेली व्यक्ती त्याचे वडील असल्याचे समोर आले. दोघे मिळून परिसरात अमली पदार्थ विक्री करायचे. यानुसार अंग झडती मध्ये त्याच्याकडे गांजा मिळून आला. तसेच त्याच्या घराच्या झडतीमध्ये 742 ग्राम गांजा, 78 ग्राम चरस व विदेशी दारू असा एकूण 2 लाख 66 हजार 288 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी पिता पुत्राविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गणी शेख याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थNavi Mumbaiनवी मुंबईArrestअटक