शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटाप्रकरणी स्क्रिप्ट रायटरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 05:32 IST

बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी चित्रपट स्क्रिप्ट रायटर देवकुमार पटेल (३७) याला सोमवारी अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ने करीत त्याच्याकडून पावणेसहा लाखांच्या नोटादेखील हस्तगत केल्या आहेत.

मुंबई : बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी चित्रपट स्क्रिप्ट रायटर देवकुमार पटेल (३७) याला सोमवारी अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ने करीत त्याच्याकडून पावणेसहा लाखांच्या नोटादेखील हस्तगत केल्या आहेत.जोगेश्वरीत मीना इंटरनॅशनल हॉटेलजवळ काही लोक बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली. त्यानुसार या कक्षाचे प्रमुख महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जोगेश्वरीत सापळा रचला. पटेल त्या ठिकाणी आला असता त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा २०००, ५००, २०० आणि १०० च्यानोटा त्यांना सापडल्या. या सगळ्या नोटा बनावट असून जवळपास ५ लाख ७८ हजार २०० रुपये किमतीच्या आहेत.नालासोपाऱ्यात राहणारा पटेल याने ‘ईश्वर एक अपराध’ नामक हिंदी चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहिले होते. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई