पुणे : रस्त्याच्या कडेला दुपारच्या वेळी झाडाखाली झोपलेल्या एका फिरस्त्या महिलेच्या डोक्यावर डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. कोंढवा खुर्द परिसरात महापालिकेच्या अशोक कचरा डेपोच्या प्रवेशद्वारासमोर गुरूवारी पावणेदोन वाजण्याच्या ही खळबळजनक घटना घडली. महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी डंपरचालकास अटक केली आहे.महिलेचे वय अंदाजे ६५ असून ती परिसरात भिक्षा मागत होती. तिचे ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. सुनिल प्रल्हाद रायबोले (वय ३४, रा. होमी प्लाझा, कात्रज) असे अटक केलेल्या डंपरचालकाचे नाव आहे. पोलीस शिपाई सैफनमुलुक नदाफ यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक फिरस्ती महिला गुरूवारी दुपारी कोंढवा खुर्द येथील कचरा डेपोच्या समोरील लिंबाच्या झाडाखाली झोपली होती.आरोपी डंपरचालक हा कचरा घेवून डेपो येथे टाकण्यासाठी आला होता. रस्त्यावरून वळताना कडेला झोपलेली महिला त्याला दिसली नाही. त्यामुळे ती डंपरच्या चाकाखाली सापडली. डोक्यावरून चाक गेल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. माहिती सहायक फौजदार पी.पी. डोईफोडे यांनी दिली.
रस्त्याच्या कडेला झोपलेल्या महिलेला डंपरने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 19:21 IST
दुपारच्या वेळी झाडाखाली झोपलेली फिरस्ती महिला
रस्त्याच्या कडेला झोपलेल्या महिलेला डंपरने चिरडले
ठळक मुद्देकोंढवा खुर्द परिसरातील घटना महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी डंपरचालकास केली अटक