शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

नदीचे दगड नेणाऱ्या डंपरची अनेक वाहनांना धडक; लग्न समारंभाहून परतणारे १३ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 08:36 IST

Accident News: गेल्या काही दिवसांपासून असेच भीषण अपघात होत आहेत. गेल्या आठवड्यात धारवाडमध्ये डॉक्टर महिला गोवा टूरवर जात असताना भीषण अपघात झाला होता.

कोलकाता : कडाक्याच्या थंडीत पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. जलपाईगुडीच्या धुपगुडी भागात डंपरने धडक दिल्याने 13 जण ठार झाले. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

धुपगुडीहून एक डंपर नदीचे दगड घेऊन मयनातलीच्या रस्त्याने जात होता. धुके असल्याने डंपर चालकाला पुढील काही दिसले नाही. यामुळे डंपरने समोरून येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. ही ध़डक एवढी भीषण होती की पुढील वाहनांचा चेंदामेंदा झाला आणि 13 जणांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. यानंतर डंपर पलटी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त लोक हे विवाहसमारंभ आटोपून माघारी परतत होते. 

अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलीस आणि मदत करणारी टीम घटनास्थळी रवाना झाली. स्थानिकांनुसार अपघातात किती लोक मृत झाले, किती जखमी झाले याची माहिती मिळालेली नाही. मृतदेह काढलेल्यांची संख्या 13 आहे, गंभीर जखमींमुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पोलिसांनी या अपघातात जखमी झालेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. धुके असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, अपघाताची तीव्रता पाहता डंपर वेगात असण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस याचा तपास करत आहेत. 

तिसरा भीषण अपघात

गेल्या काही दिवसांपासून असेच भीषण अपघात होत आहेत. गेल्या आठवड्यात धारवाडमध्ये डॉक्टर महिला गोवा टूरवर जात असताना भीषण अपघात झाला होता. यामध्ये १५ डॉक्टर ठार झाल्या होत्या. तर सोमवारी रात्री सूरतमध्ये उसाचा ट्रक पलटून झालेल्या अपघातात १४ मजूर ठार झाले होते. आजचा हा तिसरा अपघात आहे. 

टॅग्स :Accidentअपघातwest bengalपश्चिम बंगाल