शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पतीने पैसे न दिल्याने संतापलेल्या महिलेने पोटच्या गोळ्याला पाजले विष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 17:50 IST

तिचा मुलगा हर्ष (वय ५) याचा मृत्यू झाला असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. सांताक्रुझ पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

ठळक मुद्देमुलासह स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा कॉल कूपर रुग्णालयातून आलामंगळवारी उपचारादरम्यान हर्षचा मृत्यू झालारीना यांच्यावर सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु

गौरी टेंबकर - कलगुटकर 

मुंबई - पतीने घरखर्चाला पैसे न दिल्याच्या रागातून आईने चिमुरड्याला विष पाजून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना जुहू चौपाटीवर सोमवारी रात्री घडली. रीना राजेश आयरे (वय ३४) असे महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा हर्ष (वय ५) याचा मृत्यू झाला असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. सांताक्रुझ पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.जुहू तारा रोडच्या शिवाजीनगर परिसरात रीना ही पती, सासू-सासरे, मुलासह राहते. १२ नोव्हेंबरला रात्री पोलीस नियंत्रण कक्षात एका महिलेने आर्थिक अडचणीला कंटाळून मुलासह स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा कॉल कूपर रुग्णालयातून आला. त्यानुसार सांताक्रुझ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रीना यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी दिलेल्या जबाबात पती राजेश यांच्याकडे त्यांनी घरखर्चासाठी पैसे मागितले होते. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांत भांडण झाले. रागाने रीना हर्षला घेऊन जुहू चौपाटीवर आल्या. रस्त्यात एका दुकानातून उंदीर मारण्याचे विष विकत घेतले. त्यानंतर ते प्राशन केले. आपल्या मागे मुलाचे काय होणार? या काळजीने हर्षलाही विष पाजले. त्याला उलट्या होऊ लागल्या.

मुलाला होणार त्रास पाहून भानावर आलेल्या रीना यांनी तातडीने कूपर रुग्णालयात धाव घेत घडलेल्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु केले. मंगळवारी उपचारादरम्यान हर्षचा मृत्यू झाला. याप्रकरणी रीना यांच्यावर सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAndheriअंधेरी