शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Video :महालेंमुळेच जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहार उघड - दत्ता पडसलगीकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 22:17 IST

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते माजी पोलीस अधिकारी रमेश महालेंच्या २६/११ कसाब आणि मी या पुस्तकाचे प्रकाशन

ठळक मुद्देदेश आणि जगावर वारंवार हल्ले करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा महाले यांनी आंतरराष्ट्रीय तसेच न्यायालयात सिद्ध केलाएका इंग्रजी लेखकाने लिहलेल्या द सिझ या पुस्तकाचे मराठीत भाषांतर झाल्यानंतर त्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले. त्यावेळी या पुस्तकात मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढल्याने मला राग आला. २६/११ हल्यादरम्यान नेमके काय झाले हे केवळ महाले साहेबच सांगू शकतील.

मुंबई - देश आणि जगावर वारंवार हल्ले करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा महाले यांनी आंतरराष्ट्रीय तसेच न्यायालयात सिद्ध केला. यामुळे महाले साहेब, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस जिंकल्याचे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यानी केले. २६/११ हल्यातील मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांच्या २६/११ कसाब आणि मी या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.  या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास शहराचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह-पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह माजी आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. २६/११ हल्यादरम्यान नेमके काय झाले हे केवळ महाले साहेबच सांगू शकतील. कारण अगदी जवळून या हल्याचा तसेच कसाबचा अभ्यास त्यांनीच केला होता. यावेळी घरातील व्यक्तीना दुय्यम स्थान देऊन, महालेंनी पोलीस कर्तव्याला अग्रक्रम दिला. मात्र त्यांचा मला एका कारणामुळे प्रचंड राग आला होता. तो म्हणजे त्यांनी पोलीस दलातुन स्वेच्छानिवृत्ती घेतली असे पडसलगीकर म्हणाले. पुढे ते म्हणाले, त्यांच्या सारख्या अधिकाऱ्याची पोलीस दलाला आवश्यक्ता होती. त्याचप्रमाणे, या हल्याचा तपास करताना महाले अणि त्यांच्या ९८ जणांच्या टिमने टिमवर्क काय असते ? ते दाखवून दिले. असे हे टिमवर्क पोलीस दलात आवश्यक आहे. मात्र सध्या एकमेकांबद्दल धुसफुस सुरु असल्याची नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली. महाले साहेबांनी अहोरात्रं काम करून ९० दिवसात २६/११ हल्ल्याचे आरोपपत्र तयार करण्याचे अतिशय अवघड काम केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिले की पाकिस्तानातून आलेल्या व्यक्तीनेच हा हल्ला घडवून आणला आहे. या सर्व तपासातील सत्य महालेंनी बाहेर काढल्याचे मत पडसलगीकर यांनी व्यक्त केले.

एका इंग्रजी लेखकाने लिहलेल्या द सिझ या पुस्तकाचे मराठीत भाषांतर झाल्यानंतर त्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले. त्यावेळी या पुस्तकात मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढल्याने मला राग आला. त्यानंतर सत्य बाहेर काढण्यासाठी मी पुस्तक लिहण्यास घेतल्याचे रमेश महालेंनी सांगितले. २६/११ ला झालेला हल्ला नेमका गँगवार होता की काय ?काहीच समजत नव्हते. अशावेळी प्रथमच पहिला फोन आला तो दत्ता पडसलगीकर साहेबांचा. हा हल्ला पाकिस्तानचा असल्याची पहिली माहिती त्यानी दिल्याचे देवेन भारती यानी सांगितले. त्यावेळी नवी दिल्ली येथे आयबी या गुप्तचर यंत्रणेत मुंबईसाठी जबाबदारी पार पाडत होते. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला