शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘गुगल’गुरूमुळे त्याने सुरु केला बनावट नोटांचा कारखाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 22:06 IST

चक्क २ हजार रुपयांच्या हुबेहुब नोटा बनविण्याचा कारखाना कोंढव्यातील आपल्या घरात सुरु

ठळक मुद्देकोंढव्यात करत होता उद्योग; लोकांना कमिशनवर तो देत असे बनावट नोटा पुण्यासह अनेक शहरांमध्ये त्याने या बनावट नोटा विकल्या होत्या

पुणे : कंपनीत कामाला असताना त्याचे काम सुटले़ त्यानंतर त्याने गुगलवरुन नोटा कशा बनवायच्या याचा अभ्यास केला. त्यात दाखविलेल्याप्रमाणे त्याने साहित्य आणून चक्क २ हजार रुपयांच्या हुबेहुब नोटा बनविण्याचा कारखाना कोंढव्यातील आपल्या घरात सुरु केला होता. गेले वर्षभर त्याचा हा उद्योग सुरु होता. लोकांना कमिशनवर तो बनावट नोटा देत असे. पुण्यासह अनेक शहरांमध्ये त्याने या बनावट नोटा विकल्या होत्या. त्याने पुण्यात दोघा जणांना भवानी पेठेत बनावट नोटा चालविण्यासाठी पाठविले असताना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने त्या दोघांना पकडले होते. हे समजल्यावर तो फरार झाला होता. मात्र, केरळ पोलिसांनी त्याला अटक केली होती. खंडणीविरोधी पथकाने त्याला केरळ येथून ताब्यात घेतले.निधीश उर्फ पंडीत विनायक कळमकर उर्फ अक्षय विलास शर्मा (वय ३६, रा़ उंड्री) असे त्याचे नाव आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यातून फरार झाल्यानंतर शर्मा हा हैदराबाद येथे गेला होता. तेव्हा हैदराबाद पोलिसांनी त्याला अटक केली. हैदराबादमध्ये त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल होते़ हैदराबाद पोलिसांकडून केरळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली होती. पुणे शहर तसेच तळेगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल आहे. शर्मा याने उंड्री येथे एक बंगला भाड्याने घेऊन त्यात २ हजार रुपयांच्या बनावट नोटा बनविण्याचा कारखाना सुरु केला होता. त्याच्याकडून ६४ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन शुभम दिलीप क्षीरसागर (वय २४, रा़ लोणंद, ता़ खंडाळा) आणि राहुल दिनकर वचकल (वय १९, रा़ वीर,ता़ पुरंदर) हे भवानी पेठेतील व्यापाºयांना नोटा विकण्यासाठी २८ जुलै २०१९ रोजी आले होते. तेव्हा खंडणी विरोधी पथकाने त्यांना पकडले़ त्यांच्याकडून शर्मा याची माहिती मिळाली होती़ मात्र, तो तेव्हा फरार झाला. केरळवरुन त्याला ताब्यात घेऊन पुण्यात आणल्यावर त्याकडे चौकशी करण्यात आली. त्यात त्याने आपण गुगलवरुन नोटा बनविण्याची माहिती घेतली असल्याचे त्याने सांगितले. वर्षभर तो बनावट नोटा छापत असल्याचे व त्याने अनेकांना या नोटा बाजारात वितरीत करण्यासाठी विकल्या असल्याचे सांगितले आहे. आरोपीचे  यामध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का, कोणत्या साहित्यावर छपाई केली आहे. या सर्व बाबींचा तपास पोलिस करीत आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी प्रमोद मगर, मनोज शिंदे, सचिन कोकरे, फिरोज बागवान, मंगेश पवार यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेKondhvaकोंढवाfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक