शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक अडचणीमुळे चिंता वाढली, विम्याच्या रकमेसाठी व्यापाऱ्याने स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 17:43 IST

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या व्यापाऱ्याने विम्याची रक्कम आपल्या नातेवाईकांना मिळावी यासाठी स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली होती. तसेच ठरलेल्या योजनेनुसार नंतर सुपारी घेणाऱ्या चार जणांनी या व्यक्तीची हत्या केल्याचे, तपासात उघड झाले आहे.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये हत्येचा एक विचित्र गुन्हा समोर आला आहे. येथील कडकड्डूमा परिसरातून बेपत्ता झालेल्या एका व्यावसायिकाच्या हत्येचे गुढ पोलिसांनी उकलले आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह एकूण चार जणांना अटक केली आहे. दरम्यान, पोलीस तपासामधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या या व्यापाऱ्याने विम्याची रक्कम आपल्या नातेवाईकांना मिळावी यासाठी स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली होती. तसेच ठरलेल्या योजनेनुसार नंतर सुपारी घेणाऱ्या चार जणांनी या व्यक्तीची हत्या केल्याचे, तपासात उघड झाले आहे.

या व्यापाऱ्याचा मृतदेह १० जून रोजी दिल्लीतील रणहोला भागात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता. तसेच या मृतदेहाचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते. १० जून रोजी शानू बन्सल नावाच्या महिलेने आपले पती गौरव बन्सल हे  बेपत्ता असल्याची तक्रार आनंद विहार पोलीस ठाण्यात दिली होती. व्यवसायात नुकसान झाल्याने गौरव बन्सल चिंतेत होते. त्यांनी फेब्रुवारीमध्ये ६ लाखांचे पर्सनल लोक घेतले होते. त्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून त्यांच्या माहितीशिवाय ३.५० लाखांचे पेमेंटसुद्धा झाले होते. त्याची माहिती मयूर विहार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र गौरव यांचे कुणाशीही भांडण नसल्याचे तक्रारीत म्हटले होते.

मात्र तक्रारीपूर्वीच १० जून रोजी त्यांचा मृतदेह रणहोला भागात सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा संशय घेऊन तपास सुरू केला. प्राथमिक तपासामध्ये गौरव यांनी बेपत्ता होण्यापूर्वी एका अल्पवयीनाशी फोनद्वारे संपर्क साधून स्वत:च्याच हत्येची सुपारी दिल्याचे उघड झाले. ठरल्याप्रमाणे गौरव यांनी आपली कार घरीच ठेवली आणि कुठल्यातरी अन्य साधनाने ते रणहोला येथे पोहोचले. वाटेत असताना त्यांनी आरोपींना व्हॉट्स अॅपवरून आपला फोटो पाठवला होता. तिथे गेल्यावर आरोपींनी त्यांना पकडून त्यांचे हातपाय बांधले आणि त्यांना फासावर लटकवले.

आता या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह मनोज कुमार यादव, सूरज आणि सुमित कुमार या तिघांना अटक केली आहे. आता पोलीस या हत्येसाठी किती रुपयांना सुपारी देण्यात आली आहे आणि एकूण किती रकमेची सुपारी ठरली आहे. याचा शोध घेत आहेत. तसेच गौरव यांच्यावर किती रुपयांचे कर्ज होते आणि विमा कितीचा होता याचाही शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली