शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुट्या पैशांवरून झालेल्या वादातून बसवर दगफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 23:35 IST

बसमधील प्रवासी जखमी; माथेफिरूला अटक 

ठळक मुद्देयाप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका माथेफिरूला अटक केली. काही मिनिटातच गस्तीवर असलेले नेहरू नगर पोलीस घटनास्थळी पोहचले. जखमी प्रवाशाला उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबई - बेस्ट बसमध्ये वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशांवरून झालेला वाद इतका टोकाला गेला की संतप्त प्रवाशाने बसमधून उतरल्यानंतर बसवरच दगडफेक केली. या वेळी वाहकासह बसमधील एक प्रवासी जखमी झाला. याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका माथेफिरूला अटक केली. 

मुंबईतील बेस्ट बसमध्ये सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात शाब्दिक बाचाबाची होते. नुकताच चेंबूर मार्गे धावणाऱ्या बस क्रमांक 356 मध्ये घडला होता. तसाच प्रकार चेंबूरमध्ये घडला. प्रवासी असलेल्या जुबेर खान हा चेंबूर मार्गे प्रवास करत होता. सुट्ट्या पैशांवरून त्याचा बसचे वाहक प्रकाश राठोड यांच्याशी वाद झाला. हा वाद इतका पेटला की, चेंबूरमधील पोस्टल कॉलनी परिसरात बस पोहचल्यानंतर खान बसमधून उतरला. तेव्हा राग अनावर झालेल्या खान याने रस्त्यावरील दगड उचलून बसच्या दिशेने भिरकावला. हा दगड बसमधील एका प्रवाशाच्या डोक्‍याला लागून तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर बसच्या वाहकाने थेट पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून पाचारण केले होते. 

दगड लागून जखमी झालेल्या प्रवाशाला तातडीने घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही मिनिटातच गस्तीवर असलेले नेहरू नगर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी खान याला ताब्यात घेतले. वाहक राठोड यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी खान याला अटक केली. दरम्यान, जखमी प्रवाशाला उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक