शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

दारूच्या नशेत वकिलाचा पोलीस ठाण्यासह रुग्णालयात धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 03:13 IST

रात्री उशिराने जखमी तरुणाला घेऊन मद्यधुंद अवस्थेत वकील पोलीस ठाण्यात धडकला.

मुंबई : रात्री उशिराने जखमी तरुणाला घेऊन मद्यधुंद अवस्थेत वकील पोलीस ठाण्यात धडकला. पोलिसाने जखमी तरुणाची चौकशी करत, त्याला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन काढले, सोबतच वकिलालाही जाण्याचा सल्ला दिला. मात्र याच रागात वकिलाने पोलीस ठाण्यात धिंगाणा घालत, पोलिसांनाच धक्काबुक्क्की केली. रात्रभर त्याच्या धिंगाण्याने पोलिसांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणी पवई पोलिसांनी राहुल जमदाडे या वकिलाला अटक केली आहे. यापूर्वीही सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती.पोलीस उपनिरीक्षक विशाल कोरडे यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बुधवारी रात्री सव्वाएकच्या सुमारास जमदाडे हा विजय पवार या तरुणाला घेऊन पोलीस ठाण्यात आला. पवारला स्थानिकांनी मारहाण केल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ सर्व माहिती घेत त्याला पोलीस व्हॅनमधून रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्याच दरम्यान सोबतीला म्हणून त्यांनी जमदाडेलाही जाण्यास सांगितले. तेव्हा जमदाडे पोलिसांवर ओरडला, ‘मी वकील आहे, मी घेऊन जाणार का त्याला रुग्णालयात?’ असे बोलत त्यांच्या टेबलाकडे धावत गेला. तो दारूच्या नशेत असल्याने पोलिसांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. त्याच रागात त्याने पोलिसांना धमकावत, व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केले. पोलिसांनी त्याला अडविले. तरीदेखील तो ऐकत नव्हता. त्यांनी मोबाइल देण्यास सांगितले तेव्हा, त्याने पोलिसांनाच धक्काबुक्की केली.पोलिसांनी त्याच्याकडील मोबाइल काढून घेत, त्यालाही वैद्यकीय तपासणीसाठी व्हॅनमध्ये बसवले. तेव्हा त्याने पवारच्या मोबाइलवरून पोलीस नियंत्रण कक्षास फोन करून पोलिसांविरुद्धच खोट्या तक्रारी सुरू केल्या. गाडीतही पोलिसांना धक्काबुक्की आणि धमकावणे सुरू होते. तेथून त्याला ट्रॉमा केअर रुग्णालयात आणले. तेथेही त्याने आरडाओरड करत रुग्णालय डोक्यावर घेतले. तेथील डॉक्टरांसोबतही उद्धटपणे बोलत जोरजोरात गाणे बोलण्यास सुरुवात केली. तेथून तपासणी करून पुन्हा पोलीस ठाण्यात नेत असताना त्याने रुग्णालयाचा दरवाजा घट्ट पकडून ठेवला. त्यात बळाचा वापर करत तो दरवाजाच उखडला गेला. त्यात त्याच्याच हाताला दुखापत झाली. पुढे पोलीस हवालदाराच्या पोटात त्याने लाथ मारली. ट्रॉमा केअर ते पवई पोलीस ठाणे येथे वाहनातून येईपर्यंत त्याने पोलिसांना धक्काबुक्की, गाणे गाणे तसेच स्वत:ला दुखापत करून घेण्याचे काम केले. त्यातही त्याने चालत्या वाहनातून दरवाजाही उघडण्याचा प्रयत्न केला. पहाटे साडेचार वाजेपर्र्यंत त्याचा हा धिंगाणा सुरूच होता.यापूर्वीही अटकेची कारवाईवकिलाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. यापूर्वीही त्याला ३५३ च्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. यात त्याला दोषीही ठरविले होते, अशी माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली.

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी