शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

अबब! तब्बल ६० कोटींचे ड्रग्ज मुंबई विमानतळावर जप्त, परदेशी महिलेने ट्रॉली बॅगेत लपवले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 15:36 IST

Drug Smuggling Case : तिच्या झडतीत 7 हजार 6 ग्रॅम हेरॉईन आणि 1480 ग्रॅम एमडी नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

मुंबई - मुंबईविमानतळावर  हवाई गुप्तचर विभागाने (AIU)  केलेल्या तपासणीत एका महिलेकडून 60 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ही महिला झिम्बाब्वेची रहिवासी आहे. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. ही महिला १२ फेब्रुवारीला झिम्बाब्वेहून मुंबई विमानतळावर आली होती. तिच्या झडतीत 7 हजार 6 ग्रॅम हेरॉईन आणि 1480 ग्रॅम एमडी नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.झिम्बाब्वेच्या महिलेकडून जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ६० कोटी रुपये आहे. महिलेने हे ड्रग्ज तिच्या ट्रॉली बॅगमध्ये आणि फाइल फोल्डरमध्ये लपवून ठेवले होते. याप्रकरणी कारवाई सुरू असल्याचे  हवाई गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे.मुंबई विमानतळाच्या एआययूच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एक झिम्बाब्वेची महिला ड्रग्ज घेऊन मुंबईत येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहिती मिळताच अधिकारी सतर्क झाले आणि सर्व प्रवाशांवर कडक नजर ठेवली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, "प्रवाशाकडून ड्रग्जची माहिती मिळताच गुप्तचर पथकाला आफ्रिकन प्रवासी मुंबईत येताना दिसले." यादरम्यान अधिकाऱ्यांची नजर एका झिम्बाब्वेच्या महिलेवर पडली. माहिती आणि संशयाच्या आधारे अधिकाऱ्यांनी महिला आणि तिच्या सामानाची तपासणी केली.

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा तिच्या घराबाहेर गळा चिरून हत्या

फिल्मी स्टाईलने भरलं प्रेयसीच्या भांगेत कुंकू, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर प्रियकराने फिरवली पाठतपासादरम्यान अधिकाऱ्यांना 7006 ग्रॅम हेरॉईन आणि मेथॅम्पचे मिश्रण सापडले. एवढेच नाही तर महिलेकडून 1480 ग्रॅम पांढरे क्रिस्टल ग्रॅन्युल जप्त करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने तिच्या ट्रॉली बॅगमध्ये दोन फाईल फोल्डरमध्ये ड्रग्ज लपवले होते आणि त्याची किंमत सुमारे 59,40,20,000 (पाच कोटी, चाळीस लाख, वीस हजार रुपये) आहे.चौकशीत महिलेने अधिकाऱ्यांना सांगितले की, हे ड्रग्ज दिल्लीला नेले जाणार होते. परदेशातील ड्रग्ज दिल्लीत नेल्यानंतर तिच्यावर मोफत उपचार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सध्या पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे. महिलेच्या अटकेनंतर अधिकाऱ्यांना भारतातील ड्रग्ज तस्करांशी संबंधित काही मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थMumbaiमुंबईAirportविमानतळZimbabweझिम्बाब्वेAir Intelligence Unitएअर इंटेलिजन्स युनिट