Drugs case: बॉलिवूडमधील अनेक बड्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरांवर एनसीबीची छापे

By बाळकृष्ण परब | Published: November 8, 2020 11:54 AM2020-11-08T11:54:48+5:302020-11-08T12:19:26+5:30

Bollywood Drugs case News : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये ड्र्ग्सचा अँगल समोर आल्यापासून एनसीबीने ड्रग्स रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

Drugs case: NCB raids the homes of several big producers and directors in Bollywood | Drugs case: बॉलिवूडमधील अनेक बड्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरांवर एनसीबीची छापे

Drugs case: बॉलिवूडमधील अनेक बड्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरांवर एनसीबीची छापे

Next
ठळक मुद्दे एनसीबीने बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरांवरा छापे मारले एनसीबीच्या पथकाने कुठल्याही निर्माता आणि दिग्दर्शकाच्या नावांचा उलगडा न करता ही नावे गुपित ठेवली कारवाईमध्ये काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरामधून काही प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले

मुंबई - ड्र्ग्स रॅकेट प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा जोरदार कारवाईस सुरुवात केली आहे. एनसीबीने मुंबईतीलबॉलिवूडमधील अनेक बडे निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरांवर छापे टाकले आहेत. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये ड्र्ग्सचा अँगल समोर आल्यापासून एनसीबीने ड्रग्स रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार काही सिनेकलाकारांवर कारवाई केल्यानंतर आता एनसीबीने बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरांवरा छापे मारले आहेत. मात्र एनसीबीच्या पथकाने कुठल्याही निर्माता आणि दिग्दर्शकाच्या नावांचा उलगडा न करता ही नावे गुपित ठेवली आहेत. एनसीबीने ही कारवाई मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैरणे या पाच ठिकाणी केली.



नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईमध्ये शनिवारी रात्री अनेक बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरांवर छापेमारी केली. या कारवाईमध्ये काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरामधून काही प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, काल रात्रीपासून सुरू असलेली ही छापेमारी अजूनही सुरू आहे.


एनसीबीने ड्रग्स रॅकेट प्रकरणात ज्या ड्रग्स पेडलरना अटक केली होती त्यापैकी काही जणांनी बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा पुरवठा करत असल्याचे मान्य केले आहे. या ड्र्ग्स पेडलरच्या जबानींच्या आधारावरच एनसीबीने ही कारवाई केली आहे.

 

Web Title: Drugs case: NCB raids the homes of several big producers and directors in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.