कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरणारे वाहनच चक्क ड्रायव्हरने पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी घडली आहे. या वाहनात सव्वा चार करोड रुपये असून अर्नाळा पोलिसांनी नोकराने चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही कॅशव्हॅन गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भिवंडी येथील निर्जनस्थळी पोलिसांना सापडली असून यातील रोख रक्कम मात्र आढळली नाही.
ATM कॅश व्हॅन ड्रायव्हरने पळवली; ४ कोटी घेऊन झाला पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 16:53 IST
Robbery : ही कॅशव्हॅन गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भिवंडी येथील निर्जनस्थळी पोलिसांना सापडली असून यातील रोख रक्कम मात्र आढळली नाही.
ATM कॅश व्हॅन ड्रायव्हरने पळवली; ४ कोटी घेऊन झाला पसार
ठळक मुद्दे विरार पश्चिमेकडील बोळीज भागात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी आलेली कॅशव्हॅनच आरोपी ड्रायव्हरने गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती.