शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात नोकरीचे स्वप्न दाखवत खाते रिकामे, 4 जणांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 14:24 IST

आरोपींकडे लाखो भारतीयांचा डाटा, ४ परदेशी नागरिकांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमेरिका दूतावास कार्यालयात नोकरीला असल्याचे सांगून भारतीय तरुण, तरुणींना परदेशात नोकरीचे  स्वप्न दाखवून गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सायबर पोलिसांनी झांबिया, युगांडा, नामिबिया आणि घाना देशांतील चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींकडे दोन लाख ईमेल आयडी, एक लाख चार हजार वेगवेगळ्या भारतीय व्यक्तीचे मोबाइल क्रमांक सापडले असून या सर्वांची अमेरिका आणि कॅनडा येथे नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीची त्यांची योजना होती. मात्र, त्यापूर्वीच सायबर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे. 

सायबर विभागाचे पोलिस उपआयुक्त डॉ. बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.  ग्रीनवेल एमधलोवू, डोरकुस नकाबुका, सेसिलिया न्विनशेनी आणि तेसीन ऊर्फ कोफी ओंकोर डॉन अशी अटक आरोपींची नावे आहेत. ५ एप्रिल ते १ जुलै दरम्यान तक्रारदार यांची डेव्हिड नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. त्याने अमेरिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एकूण २६ लाख ३७ हजार ४७३ रुपये भरण्यास भाग पाडले. खाते रिकामे झाले तरी नोकरी न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पुढे, तांत्रिक तपास करून पुण्यातून या चौकडीला अटक करण्यात आली. आरोपींच्या पेनड्राइव्हमध्ये अमेरिका आणि कॅनडा दूतावास कार्यालयाचे बनावट ऑफर लेटर, बनावट नियुक्तिपत्र, अर्जाच्या पत्राचे नमुने, ईमेल पाठविण्यासाठी तयार केलेले ईमेल आयडी, संदेश, चॅटिंगच्या वर्ड फाइल, नोट पॅड फाइल्स, पीडीएफ ईमेल्स सापडल्या आहेत. तसेच दोन लाख ईमेल आयडी, एक लाख चार हजार वेगवेगळ्या भारतीय व्यक्तीचे मोबाइल क्रमाक सापडले. 

या सर्वांची अमेरिका आणि कॅनडा येथे नोकरीचे आमिष दाखवून टार्गेटवर असल्याचे तपासात समोर आले. चारही आरोपीना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीjobनोकरी