शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. स्वप्ना पाटकर यांना वांद्रे पोलिसांनी केली अटक; बोगस पदवी प्रकरणात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 18:11 IST

Dr. swapna Patkar arrested : भादंवि कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ठळक मुद्देकानपूर विद्यापीठाच्या बनावट पदवीबाबत हे प्रकरण आहे, तेथूनच तिने डॉक्टरेट पदवी मिळविल्याचा दावा तक्रारदार गुरदीप कौर यांनी केला आहे.

मंगळवारी (दि. ८ जून) बनावट डॉक्टर पदवी प्रकरणात सायकॉलिजिस्ट आणि चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांना वांद्रे पोलिसांनी दुपारी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. तपास अधिकारी पीआय पद्माकर देवरे यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात डॉ. स्वप्ना पाटकर यांच्याविरोधात जबाब दाखल करून २६ मे रोजी गुन्हा दाखल केला. भादंवि कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानपूर विद्यापीठाच्या बनावट पदवीबाबत हे प्रकरण आहे, तेथूनच तिने डॉक्टरेट पदवी मिळविल्याचा दावा तक्रारदार गुरदीप कौर यांनी केला आहे. कानपूर विद्यापीठातील छत्रपती शाहूजी महाराज विश्व विद्यालय, कानपुर येथून २००९ साली नमूद विषयात पीएचडी केल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून घातले आणि ते बनावट असल्याची माहिती असताना देखील २०१६ किंवा यापूर्वी त्या लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे ऑनररी कन्सल्टन्ट म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी नमूद बनावट प्रमाणपत्र खरे म्हणून वापरले. स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या गुरदीप कौर यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवली. आज डॉ. स्वप्ना पाटकर यांना अटक करण्यात आली असून उद्या रिमांडसाठी कोर्टात हजर केले जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी लोकमतला दिली. 

 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबईdoctorडॉक्टर