शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. शीतल आमटेंच्या मृत्यूचा आता घातपाताच्या दिशेने तपास, १६ जणांचे घेतले जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 06:37 IST

Shital Amte Death case : डॉ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरू केला आहे. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात असले तरी पोलिसांनी या प्रकरणात तपासाला वेगळे वळण दिले आहे.

- राजेश भोजेकर चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात, महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस घातपाताच्या दिशेने तपास करत आहेत. यासंदर्भात आनंदवनातील जवळपास १६ लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहे.डॉ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरू केला आहे. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात असले तरी पोलिसांनी या प्रकरणात तपासाला वेगळे वळण दिले आहे. डॉ. शीतल यांचा घातपात तर झाला नसावा, ही बाबही पोलीस पडताळून पाहत आहेत. यासाठी आत्महत्येपूर्वी शीतल यांना कोण भेटले, त्यांच्यात काय चर्चा झाली, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आनंदवनातील १६ जणांचे जबाब नोंदविले. दरम्यान, डॉ. शीतल या मानसिक तणावात होत्या, ही बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. या मानसिक तणावाचे कारण काय होते, या दिशेनेही तपास सुरू आहे. 

सोमवारी मिळणार अहवाल डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर काही गोष्टीसाठी व अवयव तपासणीसाठी फाॅरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल सोमवारी पोलिसांना प्राप्त होण्याची शक्यता आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर त्यांचा मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर पोलिसांची तपासाची दिशा कोणते वळण घेईल, हेही समजणार आहे. 

डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्युनंतर पोलिसांनी त्यांचे दोन मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब तपासासाठी जप्त केले. मात्र डॉ. शीतल यांनी हे उघडण्यासाठी आपले डोळेच पासवर्ड ठेवल्याने पोलीस हतबल झाले. त्यांचा पासवर्ड तोडून काढणे येथील सायबर सेललाही शक्य न झाल्यामुळे त्यांचे मोबाईल, लॅपटॉप मुंबई सायबर सेलकडे पाठविण्यात आले आहे. त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. तो आल्यावर इतर बाबींचा खुलासा होणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र