शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: डॉ. वीरेंद्रसिंह तावडे,विक्रम भावे यांचे जामीन अर्ज फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:32 IST

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टर माईंड आहे, असा दावा सीबीआयने केला आहे

ठळक मुद्देडॉ. तावडे आणि भावे यांच्या जामीनावर विशेष न्यायालयात झाली सुनावणी

पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी डॉ़ वीरेंद्रसिंह तावडे आणि विक्रम भावे यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावले. यापूर्वी डॉ़ तावडे याने तिसऱ्यांदा तर, भावे याने दुसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला होता. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टर माईंड आहे, असा दावा सीबीआयने केला आहे. विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अंदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपात स्पष्ट केले आहे.डॉ. तावडे आणि भावे यांच्या जामीनावर विशेष न्यायालयात सुनावणी झाली. डॉ. तावडे हा कॉ. पानसरे हत्या प्रकरणात आरोपी आहे. त्याची भूमिका एका साक्षीदाराने विशद केली आहे. तो या गुन्ह्यातील मास्टर माईंड आहे तर भावे याचा जामीन यापूर्वी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अर्ज करणे गरजेचे आहे.जामिनावर असताना त्याने गुन्हा केला आहे. प्रथमदर्शनी त्याच्याविरोधात पुरावे असून भावेने याने घटनास्थळी रेकी केली होती, असे इतर आरोपींनी कबुल केले आहे. त्यामुळे दोघांचे जामीन अर्ज फेटाळावेत, अशी विनंती सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी आपल्या युक्तीवादात केली. डॉ़ तावडे यांना कॉ़ पानसरे प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्या गुन्ह्यात तावडे मास्टरमार्इंड नाही, असे त्या आदेशात नमूद केले आहे़ शरद कळसकर याचा जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही़ या गुन्ह्यात त्यांचा सहभाग दिसून येत नाही, असा युक्तिवाद डॉ. तावडे व भावे यांचे वकील समीर पटवर्धन यांनी केला आहे. 

वडिलांना भेटायला परवानगीआपले वडिल वृद्ध असून सध्या ते आजारी आहेत. त्यामुळे त्यांना भेटायची परवानगी मिळावी, असा अर्ज डॉ. तावडे याने न्यायालयाला केला होता. त्यानुसार न्यायालयाने हा अर्ज मंजूर करत पोलिसांच्या उपस्थितीत वडिलांना भेटण्यासाठी डॉ. तावडे याला परवानगी दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखूनPoliceपोलिसCourtन्यायालय