शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येचे गूढ कायम; कार्यालयातील साहित्य पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 07:29 IST

सोमवारी दुपारी डाॅ. शीतल यांनी आनंदवनातील घरी आत्महत्या केली.  त्यांनी विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वरोरा (चंद्रपूर) : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात व डाॅ. विकास आणि भारती आमटे यांची कन्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येमागील कारणांचा उलगडा करण्यात पोलिस व्यस्त असून आत्महत्येला २४ तास उलटून गेले तरी गुढ उकललेले नाही.  डाॅ. शीतल  यांच्या आनंदवनातील कार्यालयातील सीसीटीव्हीचे फुटेज, लॅपटाॅप, मोबाईल, संगणक यासह औषधी व रिकाम्या सिरींज हे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

सोेमवारी दुपारी डाॅ. शीतल यांनी आनंदवनातील घरी आत्महत्या केली.  त्यांनी विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी रात्रीपर्यंत पोलिसांनी घटनास्थ‌ळाचा पंचनामा केला. मात्र ठोस पुरावा आढळला नसल्याचे तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. निलेश पांडे यांनी सांगितले.  डाॅ. शीतल  यांनी मानसिक तणावातून आयुष्य संपविल्याची चर्चा आनंदवनात आहे. मात्र त्यांना मानसिक तणाव कशाचा होता, ही बाब अद्याप अनुत्तरीत आहे.  

नाना पाटेकरांकडून  सांत्वनडाॅ. शीतल यांच्या मृत्यूची वार्ता सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना कळताच त्यांना धक्का बसला.  पाटेकर यांनी आमटे कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले. 

आमटे कुटुंबीयांचे मौनलेकीने घेतलेल्या टोकाच्या भूमिकेबद्दल आमटे कुटुंबीयांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.  शीतल यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला असता ‘आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. ’ एवढीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

आमटे कुटुंबीयांना धक्काडाॅ. शीतल ही आमटे कुटुंबीयांतील एकुलती एक लाडकी लेक होती. तिच्या आत्महत्येने आमटे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.  डाॅ. विकास व भारती आमटे यांना शीतल व कौस्तुभ असे दोन अपत्य तर डाॅ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना दिगंत आणि अनिकेत ही दोन मुले आहे. संस्थेच्या व्यवस्थापनावरून आमटे कुटुंबात कलह निर्माण झाला होता. त्यातून शीतल एकट्या पडल्या होत्या. त्यामुळे त्याच मानसिक तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आनंदवनात आहे.    

टॅग्स :Dr Sheetal Amteडॉ शीतल आमटेDr Prakash Baba Amteडॉ. प्रकाश बाबा आमटे