शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. दाभोळे दाम्पत्याची ६६ लाखांची फसवणूक, गुंगीचे औषध देऊन लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 01:45 IST

पैसे बुडविण्याच्या हेतूनेच खोटी फिर्याद दाभोळे दाम्पत्याकडून मला रुग्णालयाच्या बिलापोटी २,३३,५०३ रुपये येणे आहेत. हे पैसे बुडविण्याच्या हेतूनेच माझ्याविरुद्ध खोटी फिर्याद दिली आहे, असे म्हमाणे यांनी सांगितले.

कोल्हापूर : स्वत: चहा करून, त्यात गुंगीचे औषध घालून व एकदा दूध-भाकरीमधून गुंगीचा पदार्थ घालून घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले ६६ लाख रुपये अनिल सुभाष म्हमाणे (रा. ८७३, सोनटक्के तालीम, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर) याने चोरून नेल्याची तक्रार महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. ज. रा. दाभोळे यांच्या पत्नी रेखा दाभोळे (वय ७५) यांनी शाहूपुरी पोलिसांत गुरुवारी रात्री उशिरा दिली.फसवणुकीचा प्रकार २० जूनपासून ४ सप्टेंबर २०२० पर्यंत घडला आहे. पोलिसांनी सांगितले की, आंबेडकर चळवळीतील पुस्तके छपाईच्या माध्यमातून म्हमाने याने दाभोळे यांच्याशी ओळख वाढवली. दाभोळे यांची दोन्ही मुली अमेरिकेत असल्याने हे दोघेच फ्लॅटमध्ये राहतात. त्यांनी निवृत्तीनंतरची रक्कम विविध बँकांच्या खात्यांत गुंतवली होती. म्हमाणे याने दाभोळे यांना आर्थिक आणीबाणीची बातमी वाचून दाखवली आणि बॅँकेतील पैसे काढून घरी सुरक्षित ठेवू, असे सुचविले. त्यानुसार रेखा दाभोळे यांना घेऊन जाऊन बँकांतील ही रक्कम त्यांनी काढली व घरी आणून ठेवली. त्यानंतर म्हमाणे त्यांच्या घरी दोन वेळा गेला. एकदा स्वत:च चहा करून देतो, असे सांगून त्यामध्ये व दुसऱ्या वेळी दूध-भाकरीमधून गुंगीचे औषध घालून दिले. औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यावर घरात येऊन पैशाची पिशवी चोरून नेली.पैसे बुडविण्याच्या हेतूनेच खोटी फिर्याद दाभोळे दाम्पत्याकडून मला रुग्णालयाच्या बिलापोटी २,३३,५०३ रुपये येणे आहेत. हे पैसे बुडविण्याच्या हेतूनेच माझ्याविरुद्ध खोटी फिर्याद दिली आहे, असे म्हमाणे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी