शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या विवाहितेचा छळ; भावाने केली पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 15:20 IST

गुन्हा दाखल; ई-मेलद्वारे महिला आयोगाकडे तक्रार

ठळक मुद्दे३१ ऑगस्ट रोजी चड्डा आणि तक्रारदार यांच्या बहिणीच्या व्हिसाची मुदत संपली. तिच्या व्यावसायिक भावाने सोमवारी मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.र चड्डाने पत्नीला शिवीगाळ करून धमकी देत घरातून बाहेर काढले, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.

मुंबई - उच्चभ्रू घरातील स्थळ आल्याने भावाने थाटात बहिणीचे लग्न लावून दिले. लग्नानंतर महिनाभरातच बहीण पतीसोबत अमेरिकेला निघून गेली. मात्र, तेथे काही दिवसांतच पैसे, दागिन्यांसाठी तिचा छळ सुरू झाल्याचा आरोप करत भावाने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

अंधेरीचे रहिवासी असलेले तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या बहिणीचा २५ फेब्रुवारी रोजी मुलुंडचे रहिवासी असलेल्या भूपिंदरसिंग चड्डा याच्यासोबत विवाह झाला. त्यानंतर ती कुटुंबीयांसोबत मुलुंडमध्ये राहू लागली. १० मार्च रोजी चड्डा नोकरीसाठी अमेरिकेला निघून गेला. त्यापाठोपाठ तक्रारदार यांची बहीणदेखील अमेरिकेत राहायला गेली. काही दिवसांनंतर चड्डा हा एका आजाराने त्रस्त असून त्यासाठी त्याला औषधे घ्यावी लागत असल्याचे तक्रारदाराला बहिणीकडून समजले. शिवाय चड्डाने पत्नीचा पैसे आणि दागिन्यांसाठी छळ सुरू केला. ही बाब समजताच तक्रारदार यांना धक्का बसला.

३१ ऑगस्ट रोजी चड्डा आणि तक्रारदार यांच्या बहिणीच्या व्हिसाची मुदत संपली. चड्डाने स्वत:च्या व्हिसाचे नूतनीकरण करून घेतले. मात्र, कंपनीस सांगून पत्नीच्या व्हिसाचे नूतनीकरण होऊ दिले नाही. त्यामुळे तिचे तेथे राहणे बेकायदेशीर ठरले. त्यानंतर चड्डाने पत्नीला शिवीगाळ करून धमकी देत घरातून बाहेर काढले, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.

५ सप्टेंबरपासून चड्डाची पत्नी तेथेच शेल्टर होममध्ये राहत आहे. शेल्टर होमच्या माध्यमातून तिच्या व्हिसाचे नूतनीकरण करण्याची कार्यवाही सुरू असून व्हिसाचे नूतनीकरण होताच ती मुंबईत येणार आहे. त्यापूर्वी तिने २ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग, वांद्रे येथे वरील घटनाक्रमाला ई-मेलद्वारे वाचा फोडली. त्यानुसार, तिच्या व्यावसायिक भावाने सोमवारी मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ते अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाAmericaअमेरिकाMumbaiमुंबईmarriageलग्नDomestic Violenceघरगुती हिंसा