शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीः ज्वेलर्सकडील ३५ लाखांचे सोने लंपास करणारा भामटा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 22:01 IST

रामनगर पोलिसांनी पुणे येथून रविवारी केली अटक

डोंबिवली, लोकमत न्यूज नेटवर्क: नवीन ज्वेलर्सचे दुकान उघडणार असल्याचे सांगत  ज्वेलर्सचा व्यवसाय चालविणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीकडून  तब्बल ३५ लाख रुपयांचे जवळपास ७०० ग्रॅम वजनाचे दागिने घेवून पसार झालेल्या भामट्याला रामनगर पोलिसांनी पुणे येथून रविवारी अटक केली. विश्वनाथ जगताप असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचाकडून दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

डोंबिवली पूर्वेत राहणारे धनसुख पोपटलाल जैन यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे.याच परिसरात राहणारा विश्वनाथ जगताप याचा जैन यांच्याशी परिचय होता. याचा फायदा घेत विश्वनाथ याने  आपल्याला नवीन ज्वेलर्स चे दुकान सुरू करायचं आहे असे सांगत डिसप्लेसाठी जैन यांच्याकडून ३५ लाख रुपयांचे जवळपास ७०० ग्रँम वजनाचे दागिने घेतले होते. मात्र बरेच दिवस उलटले तरी विश्वनाथ दागिने परत देत नव्हता काही दिवसांनी विश्वनाथ पसार झाला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जैन यांनी या प्रकरणी राम नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली . तपासादरम्यान विश्वनाथ पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे  रामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने पुणे येथे जाऊन आरोपीला अटक  केल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्याकडून देण्यात आली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवलीPuneपुणेjewelleryदागिने