आयजोलपासून १६१ किलोमीटर अंतरावर असलेल्या मणिपूरच्या सीमेवरील मिझोरमच्या ईशान्य भागात साकरदाई गावाजवळ एका २९ वर्षीय डॉक्टरलाविनयभंग करून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.आयजोलच्या रामहलून उत्तर येथील रहिवासी जे.एच. वानलालनुनमाविया असे आरोपीचे नाव असून तो सध्या साकरदाई गावात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. नुकताच घडलेल्या या घटनेची माहिती पीडितेच्या कुटूंबाने साकरदाई पोलिस स्टेशनमध्ये देतफौजदारी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस ठाण्याचे प्रभारी लालझावमलियाना यांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, ही घटना सोमवारी रात्री घडली, पीडित एक स्वयंसेवी संस्थेअंतर्गत काम करते, ती आपल्या जन्मगावाच्या दिशेने डॉक्टरांच्या गाडीने साकरदाईकडे जात असताना ही घटना घडली.लालझावमलियाना पुढे म्हणाले की, आरोपीने २० व्या वर्षाच्या महिलेचा विनयभंग केला आणि विनंती मान्य केली नाही तर तिला जिवे मारण्याची धमकी दिली. या आरोपीला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आणि त्याला बुधवारी आयजल येथे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी विनयभंग, हत्या करण्याचा प्रयत्न आणि दारूच्या नशेत वाहन चालविण्याचे आरोप डॉक्टराविरूद्ध लादले आहेत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.जिल्हा कोर्टाने गुरुवारी डॉक्टरची जामीन याचिका फेटाळल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, मिझोरमची सर्वोच्च महिला संस्था मिझो ह्मेची इंसुइहखॉम पावल (एमएचआयपी), साकरदाई आणि हमार स्टुडंट्स असोसिएशनच्या (एचएसए) स्वयंसेवी संस्थांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एचएसएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोपीने प्रक्षोभक जातीय टिपण्णी वापरली आणि त्याच्याकडे माफी मागितली आहे.
डॉक्टर की हैवान! २० वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची दिली धमकी
By पूनम अपराज | Updated: October 30, 2020 19:35 IST
Molestation : आयजोलच्या रामहलून उत्तर येथील रहिवासी जे.एच. वानलालनुनमाविया असे आरोपीचे नाव असून तो सध्या साकरदाई गावात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.
डॉक्टर की हैवान! २० वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची दिली धमकी
ठळक मुद्दे लालझावमलियाना पुढे म्हणाले की, आरोपीने २० व्या वर्षाच्या महिलेचा विनयभंग केला आणि विनंती मान्य केली नाही तर तिला जिवे मारण्याची धमकी दिली.