शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

गुंगीचे औषध घातलेले ज्यूस पाजून डॉक्टर महिलेवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 06:32 IST

अडीच कोटींची लूट, नागपाड़ा पोलिसांनी  याप्रकरणी सय्यद युसुफजमाल षमविल (४७) विरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. वरळी परिसरात तक्रारदार ४१ वर्षीय डॉक्टर नेहा (नावात बदल)  राहण्यास आहेत

मनीषा म्हात्रेमुंबई : मुलगा आजारी असल्याचे सांगून डॉक्टर महिलेला घरी बोलावले. आणि गुंगीचे औषध घातलेले ज्यूस पाजून बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता बलात्काराचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत गेल्या सहा वर्षात मर्सिडीजसह तीन कार, १४० तोळे सोने आणि अडीच कोटी उकळल्याचा धक्कादायक प्रकार नागपाडा परिसरात उघड़कीस आला आहे. 

नागपाड़ा पोलिसांनी  याप्रकरणी सय्यद युसुफजमाल षमविल (४७) विरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. वरळी परिसरात तक्रारदार ४१ वर्षीय डॉक्टर नेहा (नावात बदल)  राहण्यास आहेत.  २०१४ मध्ये पतीविरुद्ध सुरू असलेल्या तक्रारीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात ये-जा करत असताना, त्यांची सय्यदसोबत ओळख झाली. सय्यद हा नागपाडा येथील डिमटीकर रोड परिसरात राहण्यास आहेत. याच ओळखीतून २०१४ मध्ये सय्यदने मुलाची तब्येत ठीक नसल्याचे सांगून नेहाला घरी बोलावले. ज्यूसमधून गुंगीचे औषध देत त्यांच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर आल्या तेव्हा, याचे व्हिडीओ, फ़ोटो काढून ते सोशल मीडियासह नातेवाइकांकडे व्हायरल करण्याची धमकी देत पैसे, दागिन्यांची मागणी सुरू केली. अशात महिलेने याबाबत बहिणीला सांगताच तिच्याकडूनही पैसे उकळण्यास सुरुवात झाली. 

२०१४ ते एप्रिल २०२० पर्यंत सय्यदने नेहाकड़ून ४० तोळे सोने आणि दीड कोटी रुपये उकळले. तर  त्यांच्या बहिणीकडून १०० तोळे सोने, १ कोटी रुपये तसेच त्यांच्या ३ गाड्या बळजबरीने ताब्यात घेतल्या. अशात, वेळोवेळी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत नेहाला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. अशात सय्यदच्या वाढत्या अपेक्षांमुळे त्यांनी २१ मार्च रोजी त्याच्याविरुद्ध तक्रार दिली.  महिलेच्या तक्रारीवरून नागपाडा पोलिसांनी बलात्कार, खंडणी, धमकावणे या कलमाअंतर्गत सय्यदविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

आरोपीचा शोध सुरुडॉक्टर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस आरोपीच्या घरी जावून आले आहेत. मात्र घरावरही बँकेची जप्ती आल्यामुळे तो तेथे मिळून आला नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संजय कुरुंदकर यांनी दिली आहे. 

मर्सिडीजवरही हात साफसय्यदने तक्रारदार यांच्या बहिणीची मर्सिडीज कारसह दोन शेवरलेट वाहनांवरही डल्ला मारला आहे. 

टॅग्स :Policeपोलिस